Devendra Fadnavis: फडणवीसांनी एका वाक्यात संपवला ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याचा विषय; म्हणाले, "श्रद्धेय बाळासाहेबांचे..."
सोलापूर: आज मुंबईत उद्धव ठाकरे अन राज ठाकरे यांचा मराठी भाषेचा विजयी मेळावा पार पडला. या कार्यक्रमात तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्रित आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोघांच्या एकत्र येण्यावर भाष्य केले होते. आम्हाला एकत्रित आणण्याचे बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमले. मात्र आता यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
आमची भाषणे संपली की एकत्रितपणे आरोळ्या ठोका. खरेतर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूने कसा एकवटतो ते मोठ्या प्रमाणावर दिसून आले. पण केवळ मोर्च्याच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरतर आजचा मेळावा शिवतीर्थावर होयला हवा होता. मात्र पावसामुळे ते शक्य नाही. कोणत्याही वादापेक्षा, भांडणाशिवाय महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनी मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्हा दोघांना एकत्र आणायचे जे बाळासाहेब ठाकरेंना जमले नाही. जे अनेकांना जमले नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
मी राज ठाकरे यांचे आभार मानतो की ठाकरे बंधू एकत्रित येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. आज विजयी मेळावा होणार असे मला सांगण्यात आले होते. पण त्या ठिकाणी रूदालीचे भाषण झाले. मराठीबद्दल एकही शब्द न बोलता आमचे सरकार गेले. सरकार पाडले. आम्हाला सरकारमध्ये घ्या, अशी ओरड दिसून आली.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1941434840873828629
बातमी अडपेट होत आहे…