fishing
मुंबई : विधान परिषदेचे आमदार भाई गिरकर (Bhai Girkar) यांनी नवी मुंबईत परप्रांतियांना विनापरवाना मच्छीविक्रीवर कारवाई करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला मत्स्य विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उत्तरे दिली. तसेच समिती गठीत करण्याचे त्यांनी संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.
[read_also content=”भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी सापडेपर्यंत चौकशी सुरुच राहणार – देवेंद्र फडणवीस https://www.navarashtra.com/maharashtra/deputy-chief-minister-devendra-fadnavis-statement-about-bhandara-rape-case-nrsr-318765.html”]
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत परप्रांतीय मच्छीमार असल्याचे समोर आल्याने आमदार रमेश पाटील, भाई जगताप, जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.(Monsoon Session) मुनगंटीवार म्हणाले की, मच्छीमारांना न्याय मिळाला यासाठी आमचा प्रयत्न असेल. मात्र अनधिकृत मच्छिमारांकडे पालिका आयुक्तांकडे तक्रार आलेली नाही, अशी पालिकेने माहिती दिली. मात्र तरीही अनधिकृत व्यवसाय करीत असल्यास आयुक्तांच्या माध्यमातून कारवाई करणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितलं.
तर परवाने कोणाला दिले, याची चौकशी करावी. ठाणे, रायगड पालघर भागातून मच्छी येते, त्याठिकाणी हा मोठा प्रश्न आहे, असा प्रश्न आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला. त्यावर मंत्री मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित करणारे सदस्य आणि आयुक्तांची समिती गठीत करण्यात येईल. तसेच तीन महिन्यात त्यांचा अहवाल सादर करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अनधिकृत मच्छीविक्री करणाऱ्यांवर समिती कारवाई करणार आहे.