Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात महाविकास आघाडी फिस्कटणार? काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी!

निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कोणत्या जागांवर आपला उमेदवार विजयी होऊ शकतो आणि किती जागा मागायच्या, याचे गणित मांडायला सुरवात केली आहे तर काहींनी आहे त्या पक्षातून उमेदवारी मिळू शकते का, याचा अंदाज घेऊन पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे(Congress, Shiv Sena ready for self-reliance in Solapur).

  • By Vanita Kamble
Updated On: May 21, 2022 | 09:18 PM
सोलापुरात महाविकास आघाडी फिस्कटणार? काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी!
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कोणत्या जागांवर आपला उमेदवार विजयी होऊ शकतो आणि किती जागा मागायच्या, याचे गणित मांडायला सुरवात केली आहे तर काहींनी आहे त्या पक्षातून उमेदवारी मिळू शकते का, याचा अंदाज घेऊन पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे(Congress, Shiv Sena ready for self-reliance in Solapur).

महाविकास आघाडीत ज्यांच्या जागा सर्वाधिक निवडून येतील, त्यांचाच महापौर आणि दुसऱ्या क्रमांवरील पक्षाचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. पण, शहरातील काही प्रभागांमध्ये तिन्ही पक्षांची समान ताकद आहे. त्या प्रभागांवर सर्व पक्षांचा दावा राहणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यास त्या पक्षातील अनेकजण विरोधी पक्षात जातील, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा मार्ग खडतर मानला जात आहे.

राज्याच्या सत्तेतील दुसऱ्या क्रमांवरील राष्ट्रवादीनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे. सध्या महापालिकेत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकावरील पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या केवळ चारच जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिकेच्या 113 जागांपैकी सर्वाधिक जागा कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात सोलापूर महापालिकेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे भाजपनेही तगडे उमेदवार शोधून सत्तेची रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, जिथे भाजपाची ताकद कमी, त्या ठिकाणी विरोधी पक्षातील नाराजांना उमेदवारी मिळू शकते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वबळावर की एकत्रित लढणार, त्यांचे उमेदवार कोण असतील, याचा अभ्यास करून शेवटच्या क्षणी भाजपा आपले उमेदवार जाहीर करू शकतो, अशीही चर्चा आहे.
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक

दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय पुढे जाहीर केला जाईल. तूर्तास बूथ बांधणी मजबूत करा, पक्षसंघटन बळकट करून जनतेला सरकारचे विशेषत: शिवसेनेचे कार्य पटवून द्या, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना केल्या आहेत.

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी व्हावी, अशी अपेक्षा आहे. पण, शिवसेनेचे सध्या महापालिकेत 22 तर चार राष्ट्रवादीचे आणि 14 काँग्रेसचे नगरसेवक होते. त्या प्रमाणात जागांचे वाटप व्हावे. शिवसेना स्वबळावर लढण्यास देखील तयार आहे.

[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]

[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]

[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]

Web Title: Congress shiv sena ready for self reliance in solapur nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2022 | 09:18 PM

Topics:  

  • Solapur Election

संबंधित बातम्या

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर
1

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.