''... असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर जनतेने कोणाकडे पाहायचे?'; प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यानंतर मालवणमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे. ठाकरे गटाचे समर्थक आणि राणे समर्थक आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटांमध्ये प्रचंड राडा होत झालेला पाहायला मिळाला. दरम्यान विरोधकांच्या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांचा पुतळा हा वेगवान वारे वाहत असल्याने कोसळला असे सांगितले होते. त्यावर आता खासदार प्रणिती शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.
राजकोट किल्ल्यावर घटनेबाबत बोलताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ”राजकोट किल्ल्यावर जे घडले ते आपल्या राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी अशी घटना होती. व्हायरल झालेले फोटो पाहून अंगावर शहरे येत होते. केवळ पंतप्रधानांना खुश करण्यासाठी या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते केले गेले. जोरदार वारे वाहत असल्याने पुतळा कोसळला असे जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर, जनतेने कोणाकडे पाहायचे?”
खासदार प्रणिती शिंदे यांनी बदलापूर घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या,”विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी चार वर्षांच्या मुलीला देखील सोडले नाही. सरकार पुतळा कोसळण्यामागे जोरदार वारा आणि बदलापूर घटनेत राजकारण केले जात आहे असे म्हणत आहे. आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. लोकसभेत जे चित्र दिसले तेच आता विधानसभेत दिसणार आहे.”
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यानंतर मालवणमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे. ठाकरे गटाचे समर्थक आणि राणे समर्थक आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटांमध्ये प्रचंड राडा होत झालेला पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला. या परिसरात आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्याचवेळी भाजप तसेच राणे समर्थकही आक्रमक झाले. त्यामुळे ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाल्याचे पाहिला मिळाले.