Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्रांची उभारणी ! आदिवासी, दुर्गम भागावर विशेष लक्ष

महाराष्ट्र राज्यामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून राज्यात तब्बल 1 लाख 427 मतदान केंद्रांची उभारणी केली गेली असून आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये विशेष लक्ष दिले गेले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 06, 2024 | 10:15 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीकरिता राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान करणे सोयीचे ठरावे याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यात मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. राज्यात सर्वाधिक मतदार असलेल्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर त्या खालोखाल नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.

शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात  घेऊन निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी गृहनिर्माण संकुलामध्ये मतदान केंद्र उभारली आहेत. त्याचप्रमाणात ग्रामीण भाग आणि आदिवासी भागामध्येही मतदानासाठी जवळचे केंद्र असावे याकरिताही मतदानाची संख्या वाढवली आहे.

राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. मागील काही विधानसभेच्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यात आली आहे.  यामुळे मतदारांची सोय होणार आहे. विशेषत: दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात पोहोचता यावे यासाठी बऱ्याच ठिकाणी आवश्यक रॅम्पची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

आदिवासी, दुर्गम भागावर विशेष लक्ष

यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, जसे की मतदार सहाय्य केंद्रे,  मतदार हेल्पलाईन ,  सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदार, महिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजण्यात आले आहेत.

शहरी गृहनिर्माण संस्थांमध्ये 1 हजारहून जास्त मतदान केंद्रे

शहरी भागांमध्ये जसे की मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये 1 हजार 181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टी परिसरातही  210 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मतदार आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅप्स वापरू शकतात. मतदार जागरूकता मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मतदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.

राज्यातील एकूण मतदानकेंद्राची जिल्हानिहाय विभागणी

जिल्हा आणि मतदान केंद्रे 

  1. पुणे – 8462
  2. मुंबई उपनगर – 7579
  3. ठाणे – 6955
  4. नाशिक – 4922
  5. नागपूर – 4631
  6. अहमदनगर – 3765
  7. सोलापूर – 3738
  8. जळगाव – 3683
  9. कोल्हापूर – 3452
  10. औरंगाबाद – 3273
  11. सातारा – 3165
  12. नांदेड – 3088
  13. रायगड – 2820
  14. अमरावती – 2708
  15. यवतमाळ – 2578
  16. मुंबई शहर – 2538
  17. सांगली – 2482
  18. बीड – 2416
  19. बुलढाणा – 2288
  20. पालघर – 2278
  21. लातूर – 2143
  22. चंद्रपूर – 2077
  23. अकोला – 1741
  24. रत्नागिरी – 1747
  25. जालना – 1755
  26. धुळे – 1753
  27. परभणी – 1623
  28. उस्मानाबाद – 1523
  29. नंदूरबार – 1434
  30. वर्धा – 1342
  31. गोंदिया – 1285
  32. भंडारा – 1167
  33. वाशिम – 1100
  34. हिंगोली – 1023
  35. गडचिरोली – 972
  36. सिंधुदुर्ग – 921

राज्यातील एकूण मतदान केंद्रे – 1,00,427 

राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

Web Title: Construction of 1 lakh 427 polling booths in maharashtra with special focus on tribal remote areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 10:14 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.