Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत नेमकं चाललंय काय? जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस सुरूच

महायुतीमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार निवडून येईल त्याला ती जागा द्यायची, असे आमचे ठरलेआ हे. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नसून, जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरवला जाईल,असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2024 | 11:05 AM
महायुतीत नेमकं चाललंय काय? जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस सुरूच
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्य विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा महायुतीतील  जागावाटपावरून होणारा संघर्ष वाढत चालला आहे. विधानसभेच्या जागावाटपावरून कोणीही महायुतीतील तीन प्रमुख नेत्यांशिवाय दुसरे कोणीही बोलू नये, अशा वरिष्ठांकडून सुचना असतानाही महायुतीतील नेते जागावाटपावरून दावे  करणे थांबवत नसल्याचे दिसून येत आहे.

आमचा पक्ष 120 जागा मागेल आणि शंभर जागा निवडून आणेल, आमच्या पक्षाला इकडे-तिकडे जाण्याची गरजही नाही, एकनाथ शिंदे आमच्या पक्षाला मोठे यश मिळवून देतील, असा दावा शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाड यांनी केला. तर, जागावाटपाबाबत कोणीही बोलू नये, आम्हाला तो अधिकार नाही,  पण जागावाटपाबाबत   मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार  जो फॉर्म्यला ठरवतील तोच अंतिम असेल, अशी प्रतिक्रीया संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर शिंदेसेनेच्यामनात आले तर ते तीनशे जागाही निवडून आणतील, पैशांच्या बळावर आपण काहीही करू शकतो. असे त्यांना वाटते, असा टोला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

हेदेखील वाचा: शिवभक्तांना आता प्रथमच भारतीय भूमीतून पवित्र कैलास पर्वताचे दर्शन घेता येणार; 15 सप्टेंबरपासून

दुसरीकडे,  राष्ट्रवादीला 80-85 जागा मिळू शकतात, काँग्रेस, अपक्ष असे धरून आमच्याकडे  60 आमदार आहेत,त्यामुळे आणखी वीस-पंचवीस जागा आम्हाला मिळाव्यात.  भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी महायुतीतील मित्रपक्षांवर अन्याय होणर नाही, असा शब्द दिल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

तर, महायुतीमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार निवडून येईल त्याला ती जागा द्यायची, असे आमचे ठरलेआ हे. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नसून, जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरवला जाईल,असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  म्हटले आहे.

 हेदेखील वाचा: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नवा वाद! इराणच्या भालाफेकपटूचं का हिसकावलं सुवर्ण पदक

Web Title: Controversy over seat allocation in the grand alliance continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 11:05 AM

Topics:  

  • Mahayuti
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
1

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
3

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा
4

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.