Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Co-operative Bank Regulation: प्रस्थापित नेत्यांची सत्ता धोक्यात; जिल्हा बँकांसाठी ‘सक्तीची निवृत्ती’चा नवा नियम

राज्यातील अनेक जिल्हा बँकांवर गेल्या दोन-तीन दशकांपासून काही ठराविक नेत्यांचे वर्चस्व आहे. या नियमामुळे या बड्या नेत्यांना आता सत्तेतून बाहेर पडावे लागणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 16, 2026 | 01:14 PM
Maharashtra DCCB Election 2026,

Maharashtra DCCB Election 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या राजकारणात मोठी खळबळ
  • ऑगस्ट 2025मध्ये 10 वर्षे किंवा त्याहून कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांना आता ‘सक्तीची निवृत्ती’
  • सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व राखणाऱ्यांवर गडांतर
Co-operative Bank Elections: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCCB) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सहकार मंत्रालयाने काढलेल्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण आदेशानुसार, सलग १० वर्षे संचालकपद भूषवलेल्या नेत्यांना आता आगामी निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांची सत्ता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील जिल्हा सहकारी किंवा नागरी सहकारी बँकांमध्ये ज्या संचालकांनी ऑगस्ट 2025मध्ये 10 वर्षे किंवा त्याहून कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्या संचालकांना आता ‘सक्तीची निवृत्ती’ स्वीकारण्याची वेळ आली आहे.

काय आहे नवीन नियम?

सहकार विभागाने पारदर्शकता आणि नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे समजते. नव्या नियमानुसार, ज्या संचालकांनी जिल्हा बँकेत १० वर्षांहून अधिक काळ संचालक पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना आता पुढील निवडणूक लढवता येणार नाही. १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले विद्यमान किंवा माजी संचालक बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी अपात्र मानले जातील.

कायद्याचा बडगा सामान्यांवरच? नवी मुंबईत ३१ पोलिस चौक्यांसह ‘अनधिकृत’ आयुक्तालयाचा खुलासा

सहकार क्षेत्रावर होणारे परिणाम:

राज्यातील अनेक जिल्हा बँकांवर गेल्या दोन-तीन दशकांपासून काही ठराविक नेत्यांचे वर्चस्व आहे. या नियमामुळे या बड्या नेत्यांना आता सत्तेतून बाहेर पडावे लागणार आहे. राज्य सरकारच्या या नव्या नियमामुळे आतापर्यंत सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे तरुण आणि नवीन चेहऱ्यांना जिल्हा बँकांच्या संचालक मंडळात काम करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सहकार क्षेत्रात कायदेशीर लढाई होण्याची चिन्हे असून, अनेक संचालक या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने सहकार आयुक्तालयाला अधिनियम २००२५ ची अंमलबजावणी करण्याच्यासूचना दिल्या आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.या मुळे जिल्ह्याच्या राजकारणातील सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या वर्चस्वाला थेट धक्का बसणार असल्याचे दिसत आहे. एकूणच सहकारी बँकांमधील अनेकांची निवृत्ती निश्चित झाली आहे.

Rail One App: रेल्वेच्या ‘रेल वन’ अॅपबाबत प्रवाशांच्या तक्रारींत वाढ; तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड

सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व राखणाऱ्यांवर गडांतर येणार आहे. या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रामधील कोट्यवधी रुपयांचा गाडा सुरळीत चालणार कसा? हा खरा प्रश्न उपस्थित होत असून, या नियमाविरूद्ध न्यायालयातही धाव घेतली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सहकार क्षेत्रात १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या बँकेंच्या संचालकांच्या अपात्रेसंदर्भात चर्चा सुरू होती. अधिनियमातील दुरुस्तीची अंमलबजावणी कोणत्या प्रभावाने लागू होते, याबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेला एक पत्र पाठवले होते. या पत्राला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने उत्तर दिले आहे. त्यानुसार, कोणत्याही सहकारी बँकेच्या संचालकांना १ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यानंतर १० वर्षे पूर्ण होत असतील तर ते या पदवर राहण्यास अपात्र ठरतील, असे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title: Cooperative sector shake up maharashtra govt issues new rules for district bank directors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.