Corona Virus new variant infected Patient Maharashtra Health Update
मुंबई : मागील चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने जगभरामध्ये थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावल होता. यावेळी आरोग्य यंत्रणावर पडलेल्या अतिरिक्त भारामुळे रुग्णांचे हाल झाले होते. आता पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्यामुळे चिंता वाढली आहे. देशामध्ये राजधानी दिल्लीसह इतर 11 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रामध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आला असून यामधील बाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. हा ना व्हेरियंट आशियन देशांमध्ये पसरत असून यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला काळजी घेण्याची गरज आहे. या नव्या कोरोना व्हेरियंटच्या बाधितांची संख्या 257 रुग्णांवर गेली आहे. मात्र पहिल्या कोरोना एवढा धोका हा नव्या व्हेरियंटचा नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याची देखील अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 56 आहे. ज्यामध्ये 44 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. नवीन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र हा तामिळनाडूपेक्षा पुढे आहे. या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमागे इतरही आरोग्याची कारणं सांगितली गेली आहेत. मृतांमध्ये 59 वर्षीय पुरुष कर्करोगाने ग्रस्त होता, तर दुसरी मृत 14 वर्षांची मुलगी होती, जी आरोग्याच्या इतर समस्यांनी ग्रस्त होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या, आतापर्यंत (20 मे) देशात कोरोनाचे सध्या 257 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये 164 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तिथे सक्रिय रुग्णांची संख्या 95 वर पोहोचली आहे. यापैकी 69 प्रकरणं नवीन आहेत. तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे सध्या 66 सक्रिय प्रकरणं आहेत. त्यापैकी 34 रुग्ण नवीन आहेत. गुजरातमध्ये कोरोनाचे सात सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पुडुचेरीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. तिथं सध्या 10 सक्रिय रुग्ण आहेत, तर तीन रुग्ण पूर्णपणे निरोगी असल्याचं घोषित करण्यात आले आहेत. हरियाणामध्येही कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन प्रकरणं नवीन आहेत. आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने केंद्र सरकारने 12 मे पासून पुन्हा कोरोना रुग्णांची आकडेवारी अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना देशातील 11 राज्यांमध्ये पसरला आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुडुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.