Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prashant Koratkar News: शिवाजी महाराजांबाबत अपशब्द…; प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा दिलासा

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 12, 2025 | 04:36 PM
Prashant Koratkar News: शिवाजी महाराजांबाबत अपशब्द…; प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा दिलासा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील सुनावणी कोल्हापूर न्यायालयात पार पडली, ज्यामध्ये न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला दिलासा दिला. न्यायालयाने त्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच, पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मार्चपासून दररोज होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वीच त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला होता.सुनावणीदरम्यान, पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली होती की, प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश द्यावेत. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता 17 मार्च रोजी होणार असून, तोपर्यंत त्याला दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी असा युक्तिवाद केला होता की, नष्ट करण्यात आलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी प्रशांत कोरटकरची आवश्यकता आहे. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; हत्येच्या आदल्या दिवशी व्यक्त केली होती भीती

आरोपी प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, त्याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच त्याच्या जीवितासही धोका होऊ शकतो. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी पोलिसांच्या मागणीवर सवाल उपस्थित करत म्हटले की, “ज्याची कायद्यात तरतूदच नाही, अशी मागणी पोलिसांनी केली कशी? या मागणीमागे कोण आहे, याचा शोध लागला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात आम्ही लढत राहू. मात्र, आम्हाला नैसर्गिक न्याय मिळेल, असे वाटत नाही, त्यामुळे न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा,” अशी त्यांनी विनंती केली.

सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, भारतीय न्याय संहितेनुसार प्रत्यक्ष हजर राहण्याची कोणतीही तरतूद नाही. नवीन कायद्यात सुधारणा करण्यात आली असली तरी याचा तपासावर कोणताही परिणाम होणार नाही.ते पुढे म्हणाले की, जामीनाच्या अंतिम सुनावणी होईपर्यंत आरोपीला अटक करता येणार नाही. तसेच, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) देखील प्रशांत कोरटकरला उपस्थित राहण्याचे कोणतेही बंधन नाही. नवीन कायद्यात अशी कोणतीही तरतूद नसताना अशा मागण्या करून उपयोग काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Court gives relief to prashant koratkar in the case of insulting shivaji maharaj nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj

संबंधित बातम्या

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
1

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
2

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार
3

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार

शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा लाभला, मात्र याचा फायदा काय?
4

शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा लाभला, मात्र याचा फायदा काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.