शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने महामार्गावर बसविलेल्या पथदिव्याचे नुकसान केले. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेही मोठे नुकसान झाल्याने शंकर पुंजाराव टेके या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील पुणे-नगर मागमार्गावर पोलीस वाहतूक नियमनाचे काम करत असताना शंकर टेके हा चालक त्याच्या ताब्यातील टेंपो भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करत घेऊन आला. दरम्यान, हा टेम्पो रस्त्याच्या मध्यभागी ग्रामपंचायतने बसविलेल्या पथदिव्यावर आदळल्याने येथील पथदिव्यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आणि टेम्पोचे नुकसान झाले.
याबाबत पोलीस शिपाई निखील भिमाजी रावडे (वय ३० वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी शंकर पुंजाराम टेके (वय ६० वर्षे रा. आलियाबाद ता. पैठण जि. औरंगाबाद) या टेम्पोचालकावर गुन्हे दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.