नववधूने सत्यनारायण पूजा होताच ठोकली धूम, गुन्हा दाखल
मुंबई / नितीन पाटील : दिवसेंदिवस मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या घटत असली तरी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने त्याचे भयावह परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागती. मात्र, सद्यस्थितीत त्यातून अनेक गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. लग्नासाठी मुलगीही शोधून भेटत नसल्याची परिस्थिती सध्या आहे.
मुलगी जन्माला येण्याआधीच तिची गर्भातच केली जाणारी हत्या हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत ज्वलंत प्रश्न बनला आहे. राज्यावर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 929 इतके आहे. जे 940 च्या राष्ट्रीय स्त्री पुरुष गुणोत्तरापेक्षा कमी आहे. ग्रामीणपेक्षा शहरी भागात हे प्रमाण जास्त आहे.
महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरांमध्ये झपाट्याने होत असलेली घट महिला लोकसंख्येला मोठा धोका निर्माण करणारी ठरत आहे. प्रचलित पूर्वग्रह किवा अनेक पुरुष मुलांकडे झुकल्यामुळे लिंग गुणोत्तरांमध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. पुरुषांच्या जन्मासाठी हे विषम प्राधान्य स्त्रीभ्रूणांमधील उच्च मृत्युदराचे सूचक आहे. लिंग गुणोत्तर हे एकूण लोकसंख्येतील स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या गुणिले 1000 अशा सूत्राने काढले जाते.
…तरीही मुलींच्या संख्येत घट
राज्यासह देशभरात गर्भलिंग निदान चाचण्या बंदी, स्त्रीभृण हत्या प्रतिबंधक कायदा असे अनेक कठोर कायदे करण्यात आलेले असताना देखील मुलींच्या प्रमाणात घट व्हावी हे चिंताजनक आहे. लिंग आधारित भेदभाव आणि गर्भपात रोखण्यासाठी सबला योजना आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना यासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवून देखील मुलींच्या संख्येत घट होत आहे.