Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणं लिहिलं पाहिजे; राज ठाकरेंनी साधला फडणवीसांवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ( Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या घोषणेनंतर ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनवले आहेत. ते त्यांच्या राजकीय भाषणामुळे प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे नाटक, सिनेमा, संगीत यावर देखील तितकेच प्रेम आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2024 | 02:43 PM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणं लिहिलं पाहिजे; राज ठाकरेंनी साधला फडणवीसांवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ( Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या घोषणेनंतर ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनवले आहेत. ते त्यांच्या राजकीय भाषणामुळे प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे नाटक, सिनेमा, संगीत यावर देखील तितकेच प्रेम आहे. मात्र राज ठाकरे यांनी गाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्यावर टीका केल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरेंना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. या गाण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कलेतून आनंद घेता आला पाहिजे – राज ठाकरे

राज ठाकरेंनी संगीत दिलेलं गाणं कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, काही गोष्टी मला सुचतात पण त्या आकारात आल्यानंतर मी त्याचा मालक नसतो. तुम्ही गीतकार म्हणून पुढे आलं पाहिजे. त्यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा देखील संदर्भ दिला. राज ठाकरे म्हणाले, हल्ली देवेंद्र फडणवीस हे देखील गाणी लिहितात. त्यांना गाणी लिहून देत तिकडे पण गरज आहे, पण मला अशा गोष्टीचे क्रेडिट घ्याला आवडत नाही. कलेतून तुम्ही आनंद घ्याला हवा. हे सगळं मी केलं आहे पण तो मी पणा चांगला नाही. मी कोणत्या माणसाचं काम केलं तर ते बोलून दाखवत नाही. आत्तापर्यंत मी एवढी भाषण केली पण स्वतःची १० भाषण देखील ऐकली नसतील. ती होऊन गेलेली प्रोसेस असते त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

स्वदेस चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मी स्वदेस चित्रपट पाहायला गेलो होतो. आशुतोष गोवारीकर यांनी आमच्यासाठी त्या सिनेमाचा प्रिव्ह्यु ठेवला होता. इंटरवल पाहून बाहेर आलो तर आशुकडे पाहिलं पुन्हा आत गेलो. चित्रपट संपल्यानंतर त्याला म्हंटल, अरे हे काय केलंयस. मला तेव्हा अजिबात सिनेमा आवडला नाही. त्याला म्हटलं हा काय सिनेमा आहे का, असं काहीतरी बोललं मी त्यालाबोललो होतो. आजही त्यासाठी मला वाईट वाटतं. पण मी घरी आल्यानंतर शांतपणे विचार केला की, मी सिनेमा पाहिला का? कारण तेव्हा माझ्या बॅक ऑफ द माईंड लगान होता. तिथे मी स्वतःच्या डोक्यातला चित्रपट घेऊन गेलो होतो, त्यामुळे त्यावेळी मला कळलं की मी सिनेमा पहिले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Deputy chief minister devendra fadnavis should write a song raj thackeray targets fadnavis bjp raj thackeray nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • devendra fadnvis
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज
1

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.