"ही भूमी रझाकरांची नव्हे तर छत्रपती शिवरायांची..."; देवेंद्र फडणवीसांनी ओवेसींना आरसा दाखवला
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारसभेतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमधून त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. उलेमांच्या मागण्या मान्य करण्यावरून त्यांनी टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले, “उलेमांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात महाविकास आघाडीने पत्र दिले. उलेमांनी १७ मागण्या केल्या होत्या. त्या मान्य केल्या गेल्या. २१०१२ ते २०२४ पर्यंत जे राज्यात दंगली झाल्या त्यात ज्या मुस्लिम समूदयाबाबत जे गुन्हे दाखल झाले, त्या केसेस मागे घेण्यासंदर्भात अशी एक मागणी होती. या सर्व मागण्या मान्य केल्या गेल्या तर आम्ही शांत कसे बसू शकतो? कॉँग्रेसच्या या मानसिकतेने देशाची वाटणी केली आहे.”
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “१९२० मध्ये कॉँग्रेसने वंदे मातरम या घोषणेवरून माघार घेतली, तेव्हाच या देशात वाटणीचे बीज रोवले गेले. आम्ही महात्मा गांधी यांना मानतो. अहिंसेला मानतो. मात्र समोरचा मारणार आणि आम्ही त्याला उत्तर देणार नाही असे कसे होईल? प्रत्येक निवडणूक आली की त्यात औरंगजेबाला आणले जाते. आम्ही निवडणुकीत औरंगजेबाला आणत नाही. ओवेसी आणतात. ते म्हणतात, महाराष्ट्र ही रझाकरांची भूमी आहे. त्यांना एकसारखी आठवण करून द्यावी लागते की, ही भूमी रझाकरांची नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ”
पालघरच्या सभेत फडणवीसांची मोठी घोषणा
नरीमन पॉइंट ते विरार हा रस्ते प्रवास केवळ ४० मिनिटांध्ये होणार आहे. कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठी जपान सरकार ४० हजार कोटींचे कर्ज देणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरू होत आहे. त्यासाठी ४० हजार कोटींचे कर्ज मिळणार आहे. तसेच वाढवण बंदरात बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे.
हेही वाचा: “आता केवळ ४० मिनिटांमध्ये नरीमन पॉइंट ते…”; देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची घोषणा
राज्यात नवीन रास्ते बांधले जात आहेत. या ठिकाणी विमानतळ झाल्यास या भागाचे चित्र बदलणार आहे. वाढवण बंदर झाल्यामुळे कोळी बांधव यांचा विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नील क्रांति योजना आणली. त्यामुळे कोली बांधवांना कर्ज मिळू लागले. मच्छिमार बांधवांच्या आयुष्यात बदल होऊ लागले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यानंतर १५ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. शेती पंपासाठी बिल भरण्याची गरज भासणार नाही. त्यांचे विजबिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर बळिराजाला वर्षभर वीज मिळणार आहे.