देवेंद्र फडणवीस यांची पालघरमध्ये सभा (फोटो- यूट्यूब)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. प्रचाराच्या तोफा लवकरच थंडावणार आहेत. मात्र त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर दौऱ्यावर होते. यावेळी प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोड संदर्भात मोठी घोषणा केली आहे. नवी मुंबई आणि मुंबईमधील अंतर कमी करण्याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नरीमन पॉइंट ते विरार हा रस्ते प्रवास केवळ ४० मिनिटांध्ये होणार आहे. कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठी जपान सरकार ४० हजार कोटींचे कर्ज देणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरू होत आहे. त्यासाठी ४० हजार कोटींचे कर्ज मिळणार आहे. तसेच वाढवण बंदरात बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे.”
“राज्यात नवीन रास्ते बांधले जात आहेत. या ठिकाणी विमानतळ झाल्यास या भागाचे चित्र बदलणार आहे. वाढवण बंदर झाल्यामुळे कोळी बांधव यांचा विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नील क्रांति योजना आणली. त्यामुळे कोली बांधवांना कर्ज मिळू लागले. मच्छिमार बांधवांच्या आयुष्यात बदल होऊ लागले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यानंतर १५ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. शेती पंपासाठी बिल भरण्याची गरज भासणार नाही. त्यांचे विजबिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर बळिराजाला वर्षभर वीज मिळणार आहे.”
आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च त्यांचे मंत्रालयातील मामा करतील. महिलांना बसमधून प्रवास करताना तिकीटामध्ये सवलत दिली. त्यामुळे नुकसानीत गेलेली एसटी फायद्यात आली. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावळेस आम्हाला विरोधकांनी वेड्यात काढले. मात्र आम्ही तब्बल अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. मात्र हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ते या लाडकी बहीण योजेनेविरुद्ध कोर्टात गेले आहेत, तसेच महायुतीचे सरकार आल्यानंतर या योजनेचे पैसे आम्ही १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा: “५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात…”; फडणवीसांनी सांगितला मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्लॅन
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्लॅन- देवेंद्र फडणवीस
धारे बांधल्याने हा संपूर्ण परिसर पाणीदार होणार आहे. निम्न पैनगंगा धरण आहे त्या पद्धतीने बांधल्यास ९५ गावे बुडण्याची भीती होती. मी बैठक घेऊन तो निर्णय बदलला आहे. ९५ गावांना मी विस्थापित होऊ देणार नाही. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आपल्या सरकारने जे काम केले आहे, त्याची नोन इतिहासात केली जाईल. कारण गोदावरीच्या खोऱ्यात जवळपास ५० टीएमसीची तूट आहे. त्यामुळे हा मराठवाडा सातत्याने दुष्काळमुक्त भाग म्हणून केंद्र सरकारकडे व राज्य सरकारकडे त्याची नोंद आहे. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढील पिढीस आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. ५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले तर मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळात राहील. या प्रकल्पाला हजारो कोटी रुपये लागणार आहेत. मात्र आमच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी सांगितले, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी चिंता करू नका. लागतील तेवढे पैसे देऊ. पण आपल्याला मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचे आहे