Maharashtra Election 2024: जे 'वस्तादा'ला जमलं नाही ते 'पठ्ठ्यानं करून दाखवलं; फडणवीसांची विजयाची हॅट्ट्र्रिक
Maharashtra Election 2024: राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान 288 जागांपैकी महायुतीने 219 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, महाविकास 52 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 17 जागांवर पुढे आहेत. महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. महायुतीच्या आणि भाजपच्या विजयात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्वाची समजली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपने सलग तिसऱ्यांदा अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
2014 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2014 ल ते मुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये ते विरोधी पक्षनेते झाले. तसेच 2022 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यात त्यान यश आले. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना अत्यंत ज्येष्ठ नेता म्हणून ओळखले जाते. तसेच शरद पवार यांना राजकारणातले वस्ताद म्हटले जाते. मात्र शरद पवार यांना तोडीस तोड नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते.
हेही वाचा: Maharashtra Election 2024: महायुतीच्या विजयानंतर फडणवीसांनी ट्वीट करत विरोधकांना डिवचले; म्हणाले…
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभेतील अपयश धुवून काढत फडणवीस यांनी विधानसभेत भाजपला अभूतपूर्व असे यश मिळवून दिले आहे. विरोधकांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबावर देखील टीका केल्याचे जनतेने पाहिले. मात्र आजचा विजय हा विरोधकांना सणसणीत उत्तर असल्याचे म्हटले जात आहे. शरद पवारांना राज्याच्या राजकरणतील चाणक्य म्हटले जाते. मात्र जे शरद पवारांना देखील जमले नाही अशी जादू फडणवीसानी करून दाखवली आहे. त्यामुळे राजकारणतल्या चाणक्याला फडणवीस यांनी धोबीपछाड दिल्याचे म्हटले जात आहे.
नागपूरमध्ये विजयी गुलाल फडणवीसांचा
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस मोठा विजय झाला आहे.