देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट (फोटो - सोशल मिडिया)
Maharashtra Assembly Result 2024: राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान 288 जागांपैकी महायुतीने 219 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, महाविकास 52 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 17 जागांवर पुढे आहेत. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 126 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. त्यानंतर अनेक भाजप नेते सागर बंगल्यावर दाखल होत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत विजय साजरा केला आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. आता मात्र मिळत असलेल्या आकडेवारीनुसार भाजप पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप पक्ष राज्यामध्ये व महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद असे जरी समीकरण असेल तरी देखील भाजप पक्षाकडे सर्वांत जास्त जागा आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रातील नेत्यांना देखील मान्य आहे. त्याचबरोबर संघाला देखील देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट काय?
देवेंद्र फडणवीस यांनी एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं ! अशा प्रकारचे ट्वीट केले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1860218713653547227
नागपूरमध्ये विजयी गुलाल फडणवीसांचा
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस मोठा विजय झाला आहे.