Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणावीसांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली, याचा काळा इतिहास लिहिला जाईल – सामनातून संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात 280 सेना निर्माण झाल्या. अमुक सेना किंवा तमुक सेना वगैरे, पण गेली 56 वर्षे टिकली ती फक्त शिवसेनाच! गुवाहाटीमध्ये 'डोंगर, झाडी, नदी, हाटील'ची मजा घेत जे आमदार बसले आहेत, त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे?

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 29, 2022 | 12:19 PM
देवेंद्र फडणावीसांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली, याचा काळा इतिहास लिहिला जाईल – सामनातून संजय राऊतांचा हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात आज सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं भाजपवर थेट टीका केली आहे. भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे आणि त्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल आणि भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

अग्रलेखात म्हटलं आहे की, हिंदुस्थान तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये ‘झाडी-डोंगर-हाटील’ वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद ‘मऱ्हाटी’ मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते, असं लेखात म्हटलं आहे.

भाजपचं काम नारदमुनीप्रमाणे चालते

सामनामध्ये म्हटलं आहे की, शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात 280 सेना निर्माण झाल्या. अमुक सेना किंवा तमुक सेना वगैरे, पण गेली 56 वर्षे टिकली ती फक्त शिवसेनाच! गुवाहाटीमध्ये ‘डोंगर, झाडी, नदी, हाटील’ची मजा घेत जे आमदार बसले आहेत, त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे? आता कोर्टबाजी सुरू झाली आहे व ‘हाटील, डोंगर, झाडी’त बसलेल्या आमदारांवर 11 तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा एक प्रकारे ‘दिलासा’च आहे. त्या दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच. विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी झाडीत बसलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. म्हणजे विधानसभेचे अधिवेशन 11 जुलैनंतरच घेता येईल. तोपर्यंत आमदारांना ‘डोंगर-झाडी-हाटील’मध्येच राहावे लागेल. या सगळ्या परिस्थितीत भाजप नक्की कोठे आहे? भाजप म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते. सुधीर मुनगुंटीवारांसारखे नेते विजयाची दोन बोटे नाचवत आपल्या गाडीतून फिरत आहेत. भाजप आपल्या मित्रांचा, सहकारी पक्षांचा ‘घास’ गिळूनच शांत होतो हे आता झाडीतल्या आमदारांना आणि नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा तसे या गटास गिळून पुढे जाईल, असं लेखात म्हटलं आहे.

रावण कितीही बलवान असला तरी विजय प्रभू रामचंद्राचाच होतो

अग्रलेखात पुढं म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालानंतर झाडी-डोंगरातील आमदारांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली- ‘हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे!” शाब्बास पठ्ठ्य़ा! आनंद दिघे हे एक निष्ठावान, कडवे शिवसैनिक होते आणि बाळासाहेबांचा विचार हाच त्यांचा श्वास व ध्यास होता. जीवनभर त्यांनी कोणत्याही पदाची आस धरली नाही. रंजल्या-गांजल्यांचे ते वाली होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्या विचारांचा विजय झाला? गद्दारी करणाऱ्यांना विरोध करणारा शिवसैनिक प्रल्हाद सावंत याच्यावर झाडीतल्या आमदारांच्या भाडोत्र्यांनी हल्ला केला हादेखील ठाकरे-दिघेंच्या विचारांचा विजयच समजावा का? शिवसेनेवर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी लढणाऱ्या संजय राऊतांवर व्यवस्थित टायमिंग साधून ‘ईडी’चे समन्स पाठवले गेले, हासुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय मानायचा का? आमदार त्या झाडी-झुडुपांतून सांगत आहेत, ”आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कुठे शिवसेना सोडली? राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही इथे झाडी-झुडुपांत आलो!” पण या बोलघेवडय़ांपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीच्या झुडुपांतूनच शिवसेनेत आले व मंत्री झाले. आता त्यांचे बोल काही असू द्यात. शरद पवारांना ते नेते मानतच होते व ”पवारांसारखा नेता होणे नाही” असे गौरवोद्गार काढीत होते. मात्र आता त्यांना महाशक्तीच्या अजगरी विळख्याने गिळले व त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची झाडी-झुडुपे, शिवसेना आवडेनाशी झाली. महाविकास आघाडी नको ना? मग या इथे. माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. नवा डाव मांडू, पण पुन्हा त्याच निष्ठेने काम करणार आहात का? रामाचे नाव घेता व रावणाची कृती करता! शिवसेनेची अयोध्याच जाळायला हे लोक निघाले आहेत. श्रीराम ही मोठीच शक्ती आहे, असं लेखात म्हटलं आहे. रावण कितीही बलवान असला तरी विजय प्रभू रामचंद्राचाच होतो हे महत्त्वाचे. महाराष्ट्राचे मंत्री त्यांची खाती सोडून, आमदार त्यांचे मतदारसंघ सोडून ‘झाडी-झुडुपांत’ बसले आहेत. याविरोधातही न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची खाती काढून घेतली, पण हे बिनखात्याचे मंत्री त्यांच्या पदाचा राजीनामा देतील तर शपथ! 11 जुलैपर्यंत या झाडी-झुडुपांतील आमदारांना गुवाहाटीतच राहावे लागेल व उद्या महाराष्ट्रात केंद्रीय सुरक्षा घेऊन परतले तरी उंदरांप्रमाणे बिळातच लपून राहावे लागेल, अशा प्रकारची चीड व संताप महाराष्ट्रीय लोकांत आहे, असं लेखात म्हटलं आहे.

Web Title: Devendra fadnavis broke the maharashtra rakshak shiv sena its black history will be written nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 11:54 AM

Topics:  

  • sanjay raut on BJP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.