Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीसांनीही घातला गुलाबी जॅकेट, या रंगात नक्की दडलंय तरी काय?, काय म्हणाले एकदा ऐकाच

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिणमधून विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा जॅकेट घातला होता. त्याची चर्चा आज संपूर्ण राज्यभर रंगली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 25, 2024 | 05:07 PM
देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिणमधून उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा जॅकेट घातला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिणमधून उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा जॅकेट घातला होता.

Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गुलाबी रंगाचं जॅकेट घालूनच बाहेर पडतात. सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारातही अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसत आहेत. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिणमधून उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी फडणवीसही अर्ज भरण्यासाठी गुलाबी रंगाचं जॅकेट घालून आले होते. त्यामुळे गुलाबी रंग आणि निवडणुकांचा नक्की संबंध काय, याची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे.

#WATCH | Nagpur | Maharashtra Deputy CM & BJP candidate from Nagpur South-West Assembly seat, Devendra Fadnavis says, “I express my gratitude to PM Modi, Union HM Amit Shah, party’s national president JP Nadda and Union minister Nitin Gadkari for showing trust in me and given me… pic.twitter.com/moi8VKfgsl

— ANI (@ANI) October 25, 2024

देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज नागपूर दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. फडणवीस सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असून १९९९ पासून एकही निवडणूक हरले नाहीत. महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी घातलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटची चर्चा होती. त्यामुळे पत्रकारांनीही या रंगाचं जॅकेट घालण्यामागचं कारण विचारलं, त्यावर ते म्हणाले, खरं सांगायचं झालं तर माझ्या मनातला रंग भगवा आहे. पण मी नेहमी सगळेच रंग वापरतो. हा एकच रंग वापरतो असं नाही, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.  लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि अजित पवार गटाला मोठं अपयश आलं. त्यानंतर अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेत प्रतिमा सुधारण्यासाठी गुलाबी जॅकेटचा पर्याय निवडल्याची चर्चा आहे.

हे देखील वाचा–Maharashtra Assembly Election : वरळीत होणार हायव्होल्डेज लढत, आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटाचा उमेदवार ठरला? 

….म्हणून मला पूर्ण विश्वास आहे

मला सहाव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आणि सेवाही पाहिली आहे. सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा विश्वास आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा-Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशदवादी हल्ला, ५ जवान गंभीर जखमी

…तोपर्यंत कोणीही आरक्षणाला हात लावणार नाही

राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांच सरर्थन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यावरचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींनी विदेशात ज्या पद्धतीचे विचार मांडले तशीच मानसिकता पंडीत नेहरुंचीही होती. इंदिरा गांधींचीही होती आणि राजीव गांधींचीही होती, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसवर केली.

Web Title: Devendra fadnavis filed his nomination form today nagpur south constituency wearing pink jacket assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Elction 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.