वरळी विधानसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. राजकीय पक्षांकडून अजून मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरू आहे. काही जागांवरील उमदेवारांची निवड अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मुंबईत वरळी मतदारसंघात यंदा हायव्होल्टेज लढतीची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांची उमदेवारी आधीच जाहीर करण्यात आली आहे. आता शिंदे गटानेही कंबर कसली असून आदित्य ठाकरेंना टक्कर देण्याची रणनीती आखली आहे.
शिवसेना शिंदे गट आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी राज्यसभा खासदार मिलिंद देवड़ा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची रणनीती आखत आहे. या संदर्भात अनेक चर्चाही झाल्या आहेत. शिंदे आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी मिलिंद देवरांसोबत चर्चा केली आहे. त्यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एक तरुण चेहरा देण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
मिलिंद देवरा यांच्याशिवाय वरळी मतदारसंघातून सीटसाठी भाजपकडून शायना एनसी यांचं नाव चर्चेत आहे. शायना एनसी म्हणजे शाइना नाना चुडासमा, ज्या फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील एक यशस्वी महिला आहेत. सध्या त्या आजपच्या प्रवक्त्या असून त्यांनी गेल्या काही दिवसांत स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठकांचे आयोजन सुरू केले आहे. मात्र महायुतीत वरळीची जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल हे अद्याप स्पष्ट ना्ही. तरीही शिंदे गटाला ही जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तर भाजप शायना एनसी यांना शिंदे गटात सामील करून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.दरम्यान आदित्य ठाकरे यांसह 150 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
लोकसभा निवडणुकीदम्यान मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव होतं. 15व्या लोकसभेत सर्वात तरुण सदस्य म्हणून मिलिंद देवरा निवडून गेले होते. केवळ 27 वर्षांच्या वया ते खासदार बनले होते. 2004 च्या निवडणुकांत मिलिंद देवरा यांनी भाजपच्या प्रत्याशी जयवंतीबेन मेहतांना 10 हजार मतांनी पराभव केला होता. 2009 मध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघात त्यांना विजय मिळाला. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. कॉंग्रेसचे मोठे नेत मुरली देवरा यांचे ते पुत्र असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानतर मुंबई कॉंग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलं आहे.
शायना यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश करत भाजपमध्ये सामील झाल्या. त्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या, राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य आणि महाराष्ट्र इकाईच्या कोषाध्यक्षा आहेत. त्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.