धनंजय मुंडे यांनी विधानसा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ५ आपत्यांचा उल्लेख केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व २८८ जागांवर जवळपास उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. उमदेवारांनी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मलमत्ता आणि व्यैयक्तिक माहिती दिली आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे परळी मतदारसंघातील उमदेवार धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ५ आपत्यांचा उल्लेख केला आहे.
धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून पुन्हा एकदा परळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याविरोधात धनंजय मुंडे रिंगणात उतरले आहेत. दरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात पाच आपत्यांचा उल्लेख केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे या दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. 2019 च्या निवडणुकीच्यात धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या शपथपत्रात या दोन अपत्यांचा उल्लेख करण्यात आला नव्हता, एबीपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
सध्या निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात ज्या पाच आपत्यांचा उल्लेख करण्यात आली आहेत. ती त्यांच्यावर अवलंबून नव्हती. शपथपत्रामध्ये शपथ पत्र देणाऱ्या व्यक्तींवरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचाच उल्लेख केला जातो. म्हणून आता शिवानी मुंडे आणि सिशिव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. गेल्या निवडणुकीत मुंडे यांनी वैष्णवी धनंजय मुंडे, जानवी धनंजय मुंडे, आदीश्री धनंजय मुंडे या तीन अपत्यांचाच उल्लेख होता. तर 2024 च्या निवडणुकीत एकूण पाच अपत्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
सीशिव मुंडे
शिवानी मुंडे
जानवी मुंडे
वैष्णवी मुंडे
आदीश्री मुंडे
धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात संपत्तीचीही माहिती दिली आहे. त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात दुपटीहून अधिक झाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून त्यांनी माहिती जाहीर केली आहे. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांकडे एकूण २३ कोटी रुपयांची संपत्ती होती. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे ५३.८० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.