कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
ऐन निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान कॉंग्रेसचे कोल्हापुरातील नेते सतेज पाटील यांनी, काँग्रेसने निवडून दिले पण एका रात्रीत निघून गेले, असा टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जयश्री जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख तसेच शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.
#कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात सन्मानाने स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी… pic.twitter.com/orLbltiZQK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 31, 2024
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात सन्मानाने स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला, एकनाथ शिंदे यांनी अशी पोस्ट एक्सवर केली आहे.
हेही वाचा-Navi Mumbai | विजय चौगुले यांचे गणेश नाईकांच्या विरोधात ऐन निवडणुकीत आंदोलन
सत्यजित जाधव यांच्याकडे उद्योग क्षेत्राच्या संबंधित जबाबदारी सोपविण्यात येईल, असंही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. जयश्री जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम झाली आहे. विद्यमान आमदार असूनही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला महिला भगिनींसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली, ही खरोखरच कौतुकाची बाब असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
महायुती सरकारने गेल्या २ वर्षात महिलांच्या प्रगतीसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या असून या योजना कोल्हापुरातील सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या प्रयत्न करतील असा विश्वास शिंदेंनी यावेळी व्यक्त केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, मित्रा महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर, शिवसेना उद्योग आघाडीचे अध्यक्ष उदय सावंत उपस्थित होते.