Maharashtra Drought 2026
मुंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे अर्ज सादर करून मुख्यमंत्र्यांना हा आहेर पाठवल्याची माहिती दिली. त्यांच्या अर्जात म्हटले आहे की, “महाराष्ट्र दुष्काळग्रस्त असताना पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चान्याची टंचाई भासत असतानाही दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री साहेबांनी प्रती शेतकऱ्याला ५००० रुपये घोषणा करून राज्यातील बळीराजाची चेष्टा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्याकडून भर पेरावा आहेर करण्यात आला आहे.”
Smart Bazaar तील अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, उलट्यांचा त्रास? ग्राहकाने केली कारवाईची मागणी
शेतकऱ्याने सांगितले की, त्यांच्या शेतात एक एकरात केवळ ४० किलो सोयाबीन निघाले. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी माजुली ट्रेडर्स येथे विक्री केल्यानंतर एक किलो कडता व १० रुपये हमाली मिळून एकूण बिल २८०० रुपये झाले. त्यातून ८० रुपये वजा जाता उरलेली रक्कम २७२० रुपये. हीच रक्कम त्यांनी मुख्यमंत्र्यांना आहेर म्हणून पाठवली आहे. “या पैशांत स्वतःच्या उपजीविकेसाठी किराणा तर उर्वरित राहिलेल्या पैशाच्या मुख्यमंत्री साहेबांना आहेर,” असे ते म्हणाले.
अर्जात पुढे म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर ‘बळीराजाचे सरकार’ म्हणून घोषणा केली, पण त्याच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. “लाडक्या बहिणीच्या भाच्याला त्या पाच हजार रुपयांत कपडे येतात काय? दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने बहिणीला-भाच्याला दिवाळीला कधी घेऊन येणार आणि त्यांचा सन्मान आम्ही कसा करणार?” असा सवाल मुंढे यांनी केला आहे.
शेतकऱ्याने प्रति हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. “आई तुळजाभवानीने नवरात्रीच्या व दशर्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री साहेबांना सदबुद्धी देवून किमान शेतकऱ्याला ५०,००० रुपये हेक्टरी देण्यात यावे,” अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
हा अर्ज व संबंधित कागदपत्रे (सोयाबीन विक्रीची पावती व स्पीड पोस्टची पावती) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी (वर्शा बंगला, मालाबार हिल, मुंबई) पोस्टाने पाठवण्यात आली आहेत. पोस्टाच्या पावतीनुसार २१ ऑक्टोबर रोजी ही रक्कम पाठवण्यात आली आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जाची नोंद झाली असून शेतकऱ्याच्या या कृतीने स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
Ans: दुष्काळी मदतीबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा ‘आहेर’ पाठवल्याचे वृत्त आहे. या कृतीमागील नेमकी भूमिका संबंधित शेतकऱ्याच्या निवेदनातून स्पष्ट करणे आवश्यक आहे.
Ans: मदत प्रत्यक्षात मिळण्यास होणारा विलंब, पात्रतेच्या अटी, अर्जप्रक्रिया आणि पंचनाम्यांशी संबंधित अडचणी या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या समस्या ठरू शकतात. मात्र, या विशिष्ट प्रकरणात नेमकी कोणती अडचण आहे, याची स्वतंत्र पडताळणी आवश्यक आहे.






