धाराशिवमध्ये 25 पेक्षा जास्त भाविकांना विषबाधा; उपवासाची भगर खाल्ल्याने अनेकांची प्रकृती बिघडली (File Photo)
बेंबळी ग्रामीण रुग्णालयात सोमवारी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत भगरीमुळे विषबाधा झाल्याचे संशयित ११ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. चार रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर उर्वरित रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.
आळणी येथेही सोमवारी रात्री असाच प्रकार घडला. भगरीचे सेवन केल्यानंतर विषबाधेची लक्षणे दिसून आलेले १५ रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
मळमळ, उलट्या आणि दृष्टी कमजोर होण्याची लक्षणे
उपवासासाठी भगर खाल्ल्यानंतर काही भक्तांना मळमळ, उलट्या आणि दृष्टी कमजोर होण्यासारखी लक्षणे जाणवली. त्यानंतर संबंधितांना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. बेंबळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश डंबळे, अधिपरिचारिका तृप्ती खोत आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार केले. आळणी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुळवे यांनी रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.
भगरीच्या विक्रीवर निर्बंध
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके पाठवून परिस्थितीवर लक्ष ठेवले. संबंधित दुकानातून भगरीचे नमुने घेऊन अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुकानातील शिल्लक भगर विक्री न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
भगरीचे नमुने FDA कडे पाठवले
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास म्हणाले, “यापूर्वी तुळजापूर तालुक्यातही अशाच प्रकारे विषबाधेची दोन प्रकरणे आढळली होती. तुळजापूर, बेंबळी आणि आळणी येथील भगरीचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. रुग्णांच्या प्रकृतीवर आणि परिस्थितीवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.”
FAQ
धाराशिवमध्ये नक्की काय झाले?
– मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव परिसरात नवरात्र/जत्रेच्या काळात 25+ भाविकांना एकाच वेळी विषबाधा झाली. भाविकांनी मंदिरातील प्रसाद खाल्ल्यानंतर काही तासातच पोटदुखी, उलट्या, जुलाब सुरू झाले.
FDA ची कारवाई काय?
– धाराशिवमध्ये FDA ने गेल्या महिन्यात (26 सप्टेंबर 2026) परभणी, हिंगोली, धाराशिवमध्ये 5 फूड युनिट्सचे लायसन्स रद्द केले.
अशी घटना वारंवार का घडते?
– महाराष्ट्रात सणासुदीत गर्दी 10-20 हजारांची असते, एका ठिकाणी अन्न बनते. एका व्यक्तीचा संसर्ग किंवा एका खराब तेलाच्या पिशवीने 25 नव्हे तर 100+ लोक आजारी पडतात.






