Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारने जिल्ह्याचं की शहराचं नाव बदललं?, दानवेंच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, म्हणाले…

धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 25, 2023 | 09:17 AM
केंद्र सरकारने जिल्ह्याचं की शहराचं नाव बदललं?, दानवेंच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव आणि औरंगाबादचे (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे. हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणं अपेक्षित असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर त्यांच्या या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर देत, त्यांना प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

अंबादास दानवे यांनी काय सवाल केलाय? 

हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे.” असं ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. दानवे यांनी हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टॅग केलं आहे. दरम्यान, अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं ट्विट शेअर करत उत्तर दिलं आहे.

फडणवीस काय म्हणाले ? 

“अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही” असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर उत्तर देत नामांतराची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

अंबादास जी,
आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. https://t.co/DyWaqjXlvO

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023

Web Title: Did the central government change the name of the district or the city deputy chief minister fadnavis answer to danves question said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2023 | 09:17 AM

Topics:  

  • AadityaThackeray
  • cmomaharashtra

संबंधित बातम्या

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत
1

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत

“म्हणून हे फडतूस कॅरेक्टर बोलू लागतात…; भाजप खासदार निशिकांत दुबेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात
2

“म्हणून हे फडतूस कॅरेक्टर बोलू लागतात…; भाजप खासदार निशिकांत दुबेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात

Crime News Updates : दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने चटके
3

Crime News Updates : दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने चटके

Crime News Updates : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील घटना
4

Crime News Updates : घरात घुसून महिलेवर कोयत्याने हल्ला; बीडमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.