Disha Salian's father Satish Salian met Mumbai Police Commissioner
मुंबई : दिशा सालियन प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियन हिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा धाव घेतली. तिच्या वडिलांनी दिशावर सामुहिक बलात्कार झाला असून तिची हत्या केली असल्याचा धक्कादायक दावा केला. त्यामुळे या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आदित्य ठाकरेंवर सत्ताधारी नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. आता दिशा सालियन हिच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत.
दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचे नाव समोर येत आहे. आज दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सतीश सालियन यांनी त्यांची मुलगी दिशा सालियान हिच्या मृत्यूबाबत पोलीस आयुक्तांकडे संशय व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील सुद्धा होते. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या दालनात ते पोहचले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पोलीस अधिकार परमबीर सिंग आणि सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियान यांनी लेखी तक्रार दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर नाव दिशा सालियान प्रकरणामध्ये आरोप केले जात आहेत. सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनेक सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांनी मागील पाच वर्षापासून हे सहन करत असून याबाबत कोर्टामध्ये उत्तर देणार असल्याचे सांगितले होते.
दिशा सालियान ही अभिनेता सुशांत सिंग रजपूत याची सिक्रेटरी होती. पाच वर्षापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. दिशा सालियान प्रकरणामध्ये तिच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यावेळी तिची आत्महत्या असल्याचे तिच्या वडीलांनी सांगितले होते. आता मात्र तिच्या सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिशा सालियनचा मृत्यू पाच वर्षांपूर्वी ८ जून २०२० रोजी झाला होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर सतीश सालियान यांची माध्यमांनी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘मला चक्कर येत आहे, तुम्ही लोक’ एवढंच ते यावेळी बोलले. एसआयटीनं स्टेटमेंट घेतलं होतं असंही ते यावेळी म्हणाले. दिशा सालियान प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून सत्ताधारी यावर न्यायाची मागणी केली आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या या प्रकरणामुळे अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.