Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत १० हजार प्रवाशांनी बांधल्या काळ्या फिती, गर्दीमुळे रेल्वे प्रवासी त्रस्त

दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे अनेकजण धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसांकडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी हे ज्वलंत वास्तव आपल्या लक्षात येईल. त्यामुळे डोंबिवलीत विविध प्रवासी संघटनांनी गुरुवारी रेल्वेला जाग यावी यासाठी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून प्रवास अभियानाला दहा हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 22, 2024 | 10:49 AM
डोंबिवलीत १० हजार प्रवाशांनी बांधल्या काळ्या फिती, गर्दीमुळे रेल्वे प्रवासी त्रस्त
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली : लोकल गाड्या वेळेवर चालवा, जादा फेऱ्या सोडा, ठाणे-कर्जत, कसारा शटल सेवा द्या, महिलांसाठी विशेष लोकल सोडा या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत विविध प्रवासी संघटनांनी गुरुवारी रेल्वेला जाग यावी यासाठी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून प्रवास अभियानाला दहा हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला. संघटना बरोबर कार्य करत असून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा उत्स्फूर्त पाठींबा नागरिकांनी दिला. विशेषतः युवा वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य।केले.

रेल्वे पोलीस दल, लोहमार्ग पोलीस यांनीही सहकार्य करून संघटनेला एकप्रकारे पाठिंबाच दिला असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. रेल्वेचा निषेध नव्हे तर आता तरी जागे व्हा या टॅग लाईनखाली संघटनांनी काळी फित बांधली. सर्वाधिक गर्दीचे बळी हे डोंबिवलीकर होत आहेत, त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. आबालवृद्ध नागरिक त्यात काली फित बांधण्यासाठी पुढे आले होते. मुंबई महानगर प्रदेशातील लोकल प्रवासी आज शब्दशः आपला मृत्यू पाठीशी घेऊनच लोकल प्रवास करीत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसांकडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी हे ज्वलंत वास्तव आपल्या लक्षात येईल.

हेदेखील वाचा – पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे खेळाडू मेडलचे प्रबळ दावेदार!

दीर्घकाळ रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रवाशांच्या तुलनेत न वाढणार्‍या लोकल फेर्‍या, मेल एक्स्प्रेस माल गाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही न करणे, साध्या लोकल ऐवजी वातानुकूलित लोकल चालविणे, सातत्याने लोकल सेवा विस्कळीत होणे या सर्व गंभीर गोष्टींमुळे आज लोकल प्रवासी प्रचंड त्रस्त आणि संकटात आहेत आणि संतप्त झाले आहेत. वरील सर्व बाबींचा पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष बैठका घेऊन रेल्वे प्रशासनासोबत सुरू आहेच. मात्र रेल्वे प्रशासनवरील सर्वच मागण्यांबाबत हतबलता व्यक्त करीत आहे. Ac लोकल चालविण्याचा आग्रह धरणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने मागील दहा वर्षात CSMT वरून नव्हे तर ठाणे स्थानकातून सुद्धा कर्जत आणि कसारा मार्गावर एकही लोकल फेरी वाढविलेली नाही यावरुन लोकल प्रवाशांना कसे गृहीत धरत आहे याची आपणास कल्पना यावी. सुखद सुरक्षित आणि संरक्षित रेल्वे प्रवास हा लोकल प्रवाशांचा अधिकार नाही काय? मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या रेल्वेच्या या प्रशासकीय अनास्थे विरुद्ध मुंबई रेल प्रवासी संघाच्या आवाहनानुसार MMR मधील लोकल प्रवासी २२ ऑगस्ट रोजी सफेद कपडे आणि काळी फित लावून प्रवास केला.

अत्यंत शांततेच्या वातावरणात हे अभियान संपन्न झाले. रेल्वेने देखील रिबीन वाटून झाल्या असतील तर सहकार्य करण्याचे आवाहन केले, त्यालाही संघटनांनी प्रतिसाद दिला. त्यावेळी महासंघ अध्यक्ष लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, कौस्तुभ देशपांडे, रेखा देढिया, तन्मय नवरे, शशांक खेर, सागर घोणे आदींसह संघटनांचे महिला, पुरुष पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाले होते.

Web Title: Dombivli news 10 thousand passengers tied black ribbon as they are suffering from the crowd while travelling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Dombivli News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.