फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा २८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारताच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ६ मेडलची कमाई केली आहे. परंतु भारतीयांना पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पॅरा खेळाडूंकडून जास्त पदकांची अपेक्षा आहे. त्यामुळे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे कोणते खेळाडू मेडलचे दावेदार आहेत यावर एकदा नजर टाकणार आहोत.
भारताचा स्टार पॅरा भालाफेकपटू अंतील सुमित हा मेडलचा प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर त्याच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक नावावर केली होते. सुन्दर सिंह गुर्जर हा सुद्धा पदकाच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. यादव अजितने हा एक उत्तम भालाफेकपटू आहे त्याने आतापर्यत चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मेडल मिळवले आहेत त्यामुळे त्याला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मेडलचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भारतचे पॅरा ॲथलेटिक्स कुमार राकेश हे गोळा फेकमध्ये भारताला मेडल मिळवून देण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा भारताचे प्रतिनिधित्व केलं होत.
THE TOP2️⃣0️⃣ MEDAL CONTENDERS 🇮🇳
With #Paralympics2024 starting in a week we present to you the Indian Medal Contenders.
Bookmark 🔖 this post and dont miss their matches along with Indian contingent participating at #Paris2024 pic.twitter.com/e94AGM1Stp
— ISH Paralympics 2024 (@ISHsportsmedia) August 22, 2024
भारताची चॅम्पियन आर्चर शीतल देवी हिला मेडलचे पक्के दावेदार म्हंटल जात आहे, तिने मागील काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. भारताचा पॅरा स्टार बॅडमिंटनपटू यथिराज सुहास याने टोकियोमध्ये सिल्वर मेडल नावावर केले होते, दीप्ती जीवनजी ही तेलंगणातील भारतीय पॅरा-ॲथलीट आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. भारताचा पॅरा डबल मेडलिस्ट मरियप्पन थांगावेलू याने रिओ ऑलिम्पिकमध्ये आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे सिल्वर आणि गोल्ड मेडल नावावर केले आहेत.