Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या वर्षात साई चरणी कोट्यवधींची देणगी, हैदराबाद येथील साईभक्‍तानं एक कोटी रुपये केले दान!

हैदराबाद येथील  साईभक्‍त राजेश्‍वर यांनी त्यांच्या फर्मच्या नावाने साई मंदिरात ही देणगी दिली आहे. त्यांनी साई कृपा वेंचरच्‍या नावे श्री साईबाबा संस्‍थानला मेडीकल फंडकरीता रुपये 25 लाखांचे 4 डिमांड ड्राफ्ट असे एकुण 1 कोटी रुपये देणगी दिली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 11, 2023 | 03:27 PM
नव्या वर्षात साई चरणी कोट्यवधींची देणगी, हैदराबाद येथील साईभक्‍तानं एक कोटी रुपये केले दान!
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : देशात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात साई भक्तांकडून नेहमीच देणगी दिली जाते. यामध्ये अनेक देश-विदेशातील भक्तांचा समावेश असतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या देण्यात आल्या. मात्र, हैदराबाद येथील एका साईभक्ताने चक्क 1 कोटी रुपये देणगी स्वरुपात दिले आहेत.राजेश्‍वर असं त्याचं नाव आहे.

[read_also content=”IAS अधिकारी चालवतायेत सेक्स रॅकेट, महिला अधिकाऱ्याने केलेल्या गौप्यस्फोटानं खळबळ, अधिकारी-आमदारांची ही पळापळ, मंत्रीही अनरिचेबल https://www.navarashtra.com/latest-news/pooja-meena-blamed-ias-pawan-arora-for-running-sex-scandal-in-jaypur-rajasthan-nrps-360983.html”]

हैदराबाद येथील  साईभक्‍त राजेश्‍वर यांनी त्यांच्या फर्मच्या नावाने साई मंदिरात ही देणगी दिली आहे. त्यांनी साई कृपा वेंचरच्‍या नावे श्री साईबाबा संस्‍थानला मेडीकल फंडकरीता रुपये 25 लाखांचे 4 डिमांड ड्राफ्ट असे एकुण 1 कोटी रुपये देणगी दिली आहे. हे डिमांड ड्राफ्ट संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍याकडे सुपुर्त केले. तसेच हैदराबाद येथील ओम श्रीराम बिल्‍डर्सचे सुभ्‍बा रेडडी हे त्‍यांच्‍या वाढदिवासा निमित्‍त श्री साईबाबा हॉस्पिटलकरीता सुमारे ४० लाख रुपये किमतीचे एक्‍सरे मशिन देणगी देणार असल्‍याची माहिती राजेश्‍वर यांनी यावेळी दिली. यावेेळी संस्‍थानचे मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे उपस्थित होते. याबरोबरच चेन्‍नई येथील देणगीदार साईभक्‍त श्री.व्‍ही.जितेंद्र यांनी ५४४ ग्रॅम वजनाची २७ लाख ७७ हजार ६६४ रुपये  किंमतीची सोन्‍याची आरती श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिली.

मागच्या वर्षी एकूण 400 कोटी

श्री साईबाबा संस्‍थानला गेल्या वर्षी एकूण 400 कोटी 17 लाख 64 हजार 201 रुपये देणगी म्हणून मिळाले आहेत. 25 डिसेंबरनंतर नववर्षाच्या मुहूर्तावर 17 कोटी 81 लाखांहून अधिक रुपयांची देणगी आली. नववर्षाच्या काही दिवसांतच आठ लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डी मंदिरात दर्शन घेतले. 400 कोटींहून अधिक रकमेपैकी 167 कोटी 77 लाख एक हजार 27 रुपये दानपेटीत आले. देणगी काउंटरवर 74 कोटी 3 लाख 26 हजार 464 रुपये कपात करण्‍याच्‍या पावत्‍यातून आले. ऑनलाइन पेमेंट, मनीऑर्डर, धनादेश आदींद्वारे 144 कोटी 45 ​​लाख 22 हजार 497 रुपये देणगी म्हणून प्राप्त झाले. एकूण देणगीमध्ये सोने, चांदी इत्यादी दागिन्यांची किंमत देखील समाविष्ट आहे. श्री साई मंदिर ट्रस्टचे पीआरओ एकनाथ गोंदकर यांच्या मते, राजा दत्ता आणि बेंगळुरूच्या शिवानी दत्ता यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने श्री साईबाबांना ९२८ ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.

Web Title: Donation of crores to sai chara in the new year a sai devotee from hyderabad donated one crore rupees nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 03:27 PM

Topics:  

  • shirdi news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.