मुंबई: विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 25 मार्च 2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 26 मार्च रोजी उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता उपाध्यक्षपदासाठी तीनही पक्षांमध्ये चुरस वाढली आहे. महायुतीतील कोणत्या पक्षाला आणि नेमक्या कोणत्या नेत्याला हे पद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रभावी मुसंडी मारली होती. त्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात होते. पण, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले.
IPL 2025 : MI विरुद्ध सामन्यात CSK वर बॉल टेम्परिंगचे आरोप, चेन्नईवर 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार?
विधानसभेतील संख्याबळानुसार अध्यक्षपद भाजपकडे कायम राहिले असून, राहुल नार्वेकर यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे आता विधानसभा उपाध्यक्ष पद महायुतीमधील कोणत्या पक्षाला मिळणार, याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. 3 मार्च 2025 पासू सुरू झालेल् हे अधिवेशन 26 मार्चपर्यंत म्हणजे आणखी तीन दिवस चालणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी राज्याचे विधानसभा आणि विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर आरोप चकमकी पाहायला मिळत आहे.नागपूर हिंसाचार प्रकरण, औरंगजेब कबरीचा मुद्दा, दिशा सालियन प्रकरण तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर त्यांनी सत्ताधाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. पुढील तीन दिवसांतही या मुद्द्यांवरून सभागृहात गरमागरमी होण्याची शक्यता आहे.
पुण्यात नेमकं चाललंय काय? चाकूच्या धाकाने दुचाकीस्वार तरुणाला लुटले
कशी असते विधानसभा उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया
विधानसभा उपाध्यक्षाची निवडणूक ही संसदीय प्रक्रियेनुसार पार पडते. ही निवडणूक विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते.
ही निवडणूक राज्याच्या संसदीय लोकशाही प्रक्रियेनुसार पार पडते आणि विधानसभेतील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकते.