कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. महावितरण, अदाणी, बेस्ट आणि टाटा या वीज वितरण कंपन्यांनी नवीन वीजदर लागू करण्याबाबत प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला वीज बिलातून दिलासा मिळणार आहे.
व्यावसायिक स्मार्ट मीटर लावलेल्या ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आणि रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 10 ते 30 टक्के वीज दर कमी होणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशिरापासून नवीन दर जाहीर केले आहेत. सरकारच्या नवीन निर्णयानुसार, राज्यातील दीड कोटींहून अधिक ग्राहकांना पुढील 5 वर्षांसाठी स्वस्त दरात वीज मिळेल. महावितरणचे 10 टक्के वीजदर कमी होणार आहेत.
याशिवाय अदाणी कंपनीचे 10 टक्के, टाटा कंपनीचे 18 टक्के आणि बेस्ट वीज कंपनीचे वीजदर 9.28 टक्के कमी होणार आहेत. कृषी ग्राहकांसाठी व व्यावसायिक ग्राहकांच्या सबसिडीचा भार एक एप्रिलपासून पुढे हळूहळू कमी होणार आहे. परिणामी, वीजदर कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
हजारो रुपयांपर्यंत येते वीज बिल
सध्याच्या दरांनुसार, वीज बिल हजारो रुपयांपर्यंत येते. वीज कंपन्या सुरक्षा ठेवीच्या नावाखाली ग्राहकांकडून वेगळे पैसे वसूल करतात. उन्हाळ्यात वाढत्या वीज वापरामुळे, निर्धारित युनिटपेक्षा जास्त वीज वापरली जाते. परिणामी, वीज दर स्लॅब बदलतो. वीज बिलात आणखी अनपेक्षित वाढ झाली आहे.
शनिवारी रात्री उशिरा दर केले जाहीर
साधारणपणे, महाराष्ट्रात विजेचे दर 4 दरवर्षी सरासरी 9 टक्के दराने वाढतातः परंतु महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) ने पहिल्यांदाच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. वीज दर कमी करण्याच्या उद्देशाने सरकारनेही त्यावर सहमती दर्शवली आहे, त्यानंतर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा नवीन दर जाहीर केले आहेत.