Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायलट ट्रेनिंग सेंटरची देशपातळीवर उभारणी करा ,एअर टॅक्सीचा वापर शेतीसाठी करा; नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी

हवाई वाहतूक क्षेत्र हे आता केवळ उड्डाणांचे नव्हे तर भारताच्या प्रगतीचे प्रतीक बनत आहे. म्हणूनच पायलट ट्रेनिंग सेंटरची देशपातळीवर उभारणी करा अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2025 | 05:44 PM
पायलट ट्रेनिंग सेंटरची देशपातळीवर उभारणी करा ,एअर टॅक्सीचा वापर शेतीसाठी करा; नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी

पायलट ट्रेनिंग सेंटरची देशपातळीवर उभारणी करा ,एअर टॅक्सीचा वापर शेतीसाठी करा; नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी

Follow Us
Close
Follow Us:

स्नेहा काकडे :  हवाई वाहतूक क्षेत्र हे आता केवळ उड्डाणांचे नव्हे तर भारताच्या प्रगतीचे प्रतीक बनत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हवाई वाहतूक सेवा `फायटर जेट’च्या वेगाने पुढे जात आहे. सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा विमान प्रवास, देशभरात पायलट ट्रेनिंग सेंटरची उभारणी, ड्रोन, एअर टॅक्सीचा वापर शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावी पणे करावा, सर्व लहान-मोठ्या विमानतळांवर वायफाय सेवा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या महत्वपूर्ण सूचना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.

संसदेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक 2025 (Protection of Interests in Aircraft Objects Bill, 2025) या महत्त्वपूर्ण विधेयकावर खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतील चर्चेत भाग घेत वरील महत्वपूर्ण सूचना केल्या.

एक काळ होता जेव्हा भारताची अर्थव्यवस्था विमानासारखी होती खरी, पण तिचा `पायलट’च निश्चित नव्हता. UPA  सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंह यांच्यासारखी सन्माननीय व्यक्ती पायलट म्हणून होती, पण विमानाचं कंट्रोल राहुल गांधींसारख्या अनुभवहीन व्यक्तीकडे दिले गेले. त्यांनी `UPA फ्लाइट’चं जे अपघाती लँडिंग केलं, त्यातून ती फ्लाइट अद्याप टेक-ऑफ करू शकलेली नाही. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांना पायलट बनवण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथंही ते विमान धावपट्टी सोडून आकाशात उडूच शकलं नाही, अशी मिश्किल टीप्पणी करत खासदार नरेश म्हस्के यांनी आज भारताचे विमान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या कणखर पायलटकडे असल्याचे कौतुक केले. राम मोहन नायडू आणि मुरलीधर मोहोळ या तरुण मंत्र्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देणं हेच दर्शवतं की, नरेंद्र मोदींचं सरकार हे युवा नेतृत्वावर विश्वास ठेवतं आणि भारताच्या आकाशात नवी पिढी नवसंजीवनी घेऊन येत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

 

आज भारत हवाई क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. एकेकाळी हवाई प्रवास हा केवळ विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता, पण आज सामान्य माणसाला आकाशात झेप घेता येऊ लागली आहे.  उडाण योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक लहान शहरं आणि दुर्गम भाग हवाई मार्गाने जोडले गेले आहेत. देशात 2014 मध्ये केवळ 74 विमानतळ होते, पण आज ती संख्या 157 वर पोहोचली आहे.  डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून, भारत आज जागतिक नागरी विमान वाहतूक नकाशावर एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. महिला पायलट्सची टक्केवारीही जागतिक सरासरीच्या तिप्पट आहे जी आपल्या सामाजिक प्रगतीचाही दाखला देते. डिजिटायझेशन, ग्रीन एनर्जी, आधुनिक विमानतळ सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियमन यामुळे भारताची हवाई वाहतूक एक नवा अध्याय लिहू लागली आहे, जो केवळ आकाशात नव्हे, तर आर्थिक प्रगतीच्या मार्गावरही देशाला उंच नेत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

भारताने 2008 मध्ये केपटाउन कन्वेंशनला मान्यता दिली होती ज्याचा उद्देश होता की, विमान, हेलिकॉप्टर आणि इंजिन सारख्या महागड्या उपकरणांवर वित्तीय हक्क आणि मालकी अधिकारांसाठी आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट तयार करणं. पण यासाठी भारतात अजून कोणतंही स्पष्ट कायदेशीर रूप नव्हतं. संसदेत आता सादर झालेले हे विधेयक हेच भरून काढणार असल्याचे खासदार  नरेश म्हस्के म्हणाले.

या विधेयकाद्वारे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation) ही नोंदणी आणि डि-नोंदणीसाठी अधिकृत प्राधिकरण म्हणून नियुक्त केली गेली आहे. जे विमान घेणार आहेत ते नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला माहिती देतील, आणि कर्जदार जर चुकले तर, केवळ दोन महिन्यांच्या आत धनको विमान परत घेऊ शकतो. यातून भारतात विमान भाडे तत्वावर देणारी यंत्रणा सक्षम होईल. ज्यामुळे आपल्याला दुबई, सिंगापूर, आयर्लंडसारख्या देशांकडून विमाने भाड्याने घ्यावी लागणार नाहीत. यामुळे केवळ परकीय चलनाची बचत होणार नाही, तर रोजगाराच्या संधी वाढतील आणि आर्थिक गतीला बळ मिळेल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

हवाई सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी AI-आधारित मॉनिटरिंग सिस्टीम आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी नेमणे, प्रवाशांच्या सोयीसाठी लहान-मोठ्या विमानतळांवर वायफाय सुविधा, उत्कृष्ट स्वच्छता सुविधा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना, विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा व्हावा यासाठी भाड्यांवर किंमत मर्यादा लागू करणे, भविष्यातील तंत्रज्ञान जसं की ड्रोन, एअर टॅक्सी यांच्यासाठी स्पष्ट, कठोर आणि व्यावहारिक नियम बनवून त्याचा शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावी उपयोग करणे. पायलट प्रशिक्षणाची सध्या खूप जास्त किंमत असून, आवश्यक साधन संपत्ती कमी आहे. त्यामुळे देशात अधिक दर्जेदार, परवडणारी पायलट ट्रेनिंग सेंटर्स उभारणं ही काळाची गरज आहे, अशा महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या.

या महत्त्वाच्या विधेयकावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, लोकसभेतील गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानत भारताच्या उड्डाणाला स्थिरतेचे इंजिन, आत्मनिर्भरतेची दिशा आणि युवाशक्तीचं इंधन लाभल्यावर, भारत अजून उंच झेप नक्की घेईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी शेवटी व्यक्त केला.

Web Title: Establish pilot training centers nationwide use air taxis for agriculture naresh mhaskes demand in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • airport
  • Naresh Mhaske
  • Parliament News

संबंधित बातम्या

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
1

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन
2

Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
3

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

“आ रे रे, उद्धव ठाकरे… काय तुमची दिल्लीत किंमत?” नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका
4

“आ रे रे, उद्धव ठाकरे… काय तुमची दिल्लीत किंमत?” नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.