Even after heavy rain Dharashiv District Collector Kirti Kiran Navratri dance video goes viral
Dharashiv Collector Kirti Kiran Dance : धाराशिव : महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. परतीच्या पावसाने पिकांना पूर्णपणे आडवे केले. शेतीसह पूर्ण सूपीक जमीन वाहून गेल्या आहेत. सोलापूर, धाराशिव, मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतामध्ये, घरांमध्ये आणि बळीराज्याचा डोळ्यांमध्ये पाणीच पाणी आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळाची कठीण परिस्थिती असताना धाराशिवमधील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धाराशिव जिल्हा पाण्याखाली गेलेला असताना जिल्हाधिकारी हे नाचगाण्यांमध्ये दंग असल्याचे दिसून आले. याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चौफेर टीका केली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेती, रस्ते अगदी महामार्ग देखील पाण्याखील असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामधील नागरिक हे आसमानी संकटामध्ये आहेत. बुधवार 24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर आणि सोलापूर पूर परिस्थितीची पाहणी केली. राज्यातील सर्व नेचे आणि पालकमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांध्यावर गेलेले दिसून येत आहेत. तसेच नुकसान भरपाईचा अंदाज आणि पंचनामे केले जात आहेत. सर्वच यंत्रणा कामाला लागली असताना जिल्हाधिकारी मात्र नाच-गाण्यामध्ये दंग झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवरात्रीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तुळजापूर येथे आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे सहभागी झाले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांनी आपल्या पत्नीसह आणि धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कलावंतासह डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर चौफेर टीका केली जात आहे.
Watch : #Dharashiv crisis deepens, #farmers losing crops — but #DistrictCollector Kirti Kiran Pujar caught dancing at a #Tuljapur event. Viral video sparks outrage over “insensitive, irresponsible” conduct amid farmers’ distress. #MaharashtraRains #HeavyRainfall @IASassociation pic.twitter.com/0Yna9EGSEv — Vivek Bhavsar (@vivekbhavsar) September 26, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जिल्ह्यांमध्ये पाणी शिरले असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. असे असताना जिल्हाधिकारी हे नाच-गाण्यामध्ये दंग असल्यामुळे सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी यांनी ही आपली त्यांच्या प्रति असलेली असंवेदना दाखवून दिली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे. मात्र जिल्हा संकटामध्ये असताना त्यांनी केलेले हे कृत्य अनेकांच्या पसंतीस उतरलेले नाही.