'माझ्या हत्येचा कट रचला जातोय..; बिहारच्या बड्या नेत्याचा आरोपाने खळबळ
Bihar Politics: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकारण तापू लागलं आहे. अशातच बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर आरोप केले आहेत. एक महिन्यापूर्वी त्यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आलीअसून बिहारचे दोन प्रमुख नेते आणि दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप पप्पू यादव यांनी केला आहे. यादव यांच्या या दाव्यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ माजली आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार यादव म्हणाले की, महिनाभरापूर्वी मला वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली होती. पण फक्त एका महिन्यातच ती सुरक्षा काढून घेण्यात आली. बिहारचे दोन प्रमुख नेते आणि दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या हत्येचा कट रचत आहेत. जाणीवपूर्वक माझी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. पण जर माझ्यासोबत काही घटना घडली, तर हे दोन प्रमुख नेते आणि दोन वरिष्ठ अधिकारी त्यासाठी जबाबदार असतील.” यादव यांच्या या आरोपांनंतर राजकीय व सुरक्षा प्रशासनात तणाव निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासनाकडून या गंभीर आरोपांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा
याचवेळी पप्पू यादव यांनी जनता दल (युनायटेड) चे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्यावर थेट आरोपही केले आहेत. संजय झा हे या कटाच्या केंद्रस्थानी आहेत. संजय झा यांनी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यांचा पक्ष विकला आहे. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या राजकीय संधींचा ते व्यापार करत आहेत.
खासदार पप्पू यादव यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. “मी कोणत्याही किंमतीत भाजपच्या नेत्याला बिहारचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, हे संजय झा यांना माहित आहे. त्यामुळे माझ्या जीवाशी तडजोड केली जात आहे.सीमांचल, कोसी आणि मिथिलामध्ये भाजपला आव्हान देणारा मी एकमेव नेता असल्यामुळेच माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र रचले जात आहे.
Constipation Remedy: सडून राहिलेले शौच पडेल त्वरीत बाहेर, 3 स्टेप रूटीनमुळे सकाळीच होईल पोट साफ
दरम्यान, यावेळी पप्पू यादव यांनी सुरक्षा यंत्रणांना त्यांची सुरक्षा पुन्हा देण्याचेही आवाहन केलं आहे. त्यांनी सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगून संपूर्ण सुरक्षा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पप्पू यादव यांच्या विधानामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. जेडीयू आणि भाजपच्या छावण्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, राजकीय पारा वाढला आहे. पप्पू यादव यांच्या आरोपांमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आणखी वाढला आहे. सरकार त्यांची सुरक्षा पुनर्संचयित करेल का हे पाहणे बाकी आहे.