exempt property tax to flat owners in palava 15 day ultimatum to kdmc mns mlas will take to the streets nrvb
अमजद खान, कल्याण ग्रामीण : कल्याण ग्रामीणमध्ये (Kalyan Gramin) पलावा (Palava) येथील २५ हजार फ्लॅटधारकांना (25 Thousand Flat Owners) आयटीपी प्रकल्पात (ITP Project) समाविष्ट करण्याच्या मागणीनंतर यात श्रेयासाठी शिंदे गटातील लोकप्रतिनिधी राजकारण (Politics) करत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू (Raju Patil, MLA, MNS) पाटील यांनी केला होता. त्यानंतर आज फ्लॅटधारकांसोबत आमदारांनी आज बैठक पार पडली. आमदारांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत दिले आहे. प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेट दिला आहे. यासाठी नागरीकांची समिती गठीत करण्यात येणार आहे.
पलावा कासा रिओ क्लब हाऊसमध्ये आज पार पडलेल्या फ्लॅटधारकांच्या बैठकीस मोठ्या प्रमाणात फ्लॅटधारक उपस्थित होते. पलावा येथील प्रकल्प हा आयटीपी प्रकल्प आहे. या प्रकल्पधारकांना मालमत्ता करात ६६ टक्के सूट दिली गेली पाहिजे. मात्र महापालिकेकडून या फ्लॅटधारकांकडून मालमत्ता वसूलीकरीता जप्तीची नोटिस बजावण्यात आली आहे. या फ्लॅटधारकांकडून महापालिकेने ४० कोटी रुपये आधीच वसूल केले आहेत. हे जास्तीचे पैसे परत करावे अथवा ते मालमत्ता कराच्या बिलात अॅडजस्ट करावे अशी मागणी आहे.
[read_also content=”‘यांचे’ खिसे ओले करण्यासाठी टँकर माफीयांचा हैदोस, टँकर मध्येच होतोय लाखो लीटर पाणी उपसा; पाटबंधारे विभागाचे सपशेल दुर्लक्ष! https://www.navarashtra.com/crime/water-theft-in-kalyan-millions-of-liters-of-water-are-pumped-in-the-tanker-itself-complete-neglect-of-the-irrigation-department-nrvb-382476.html”]
या मागणीला घेऊन नुकतीच आमदारांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली होती. ही मागणी प्रशासनाकडून मान्य करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. मात्र शिंदे गटातील एक मोठा लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणत आहे. हा दबाव श्रेयासाठी टाकला जात असून या कामाचे श्रेय मनसे आमदारांना मिळू हा त्या मागचा उद्देश आहे.
हीच बाब आज पार पडलेल्या बैठकीत फ्लॅटधारकांसमोर आमदार पाटील यांनी स्पष्ट केली. प्रशासनाला या प्रकरणी १५ दिवसांचा अल्टीमेट दिला आहे. अन्यथा काय करायचे ते ठरविले जाणार आहे. तसेच फ्लॅटधारकांची एक समिती स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे हीच मागणी लावून धरली जाणार आहे.
यावेळी अनेक फ्लॅटधारकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. पलावामध्ये बिल्डरकडून ज्या सोयी सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे होत्या त्या पुरविल्या गेलेल्या नाहीत. जवळल असलेली देसाई खाडी प्रदूषित झाली आहे. त्या प्रदूषणाचा त्रस नागरीकांना सहन करावा लागत आहे. पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी होत आहे. पलावा उड्डाणपूलाचे काम रखडले आहे. ते केव्हा मार्गी लागणार.
[read_also content=”ग्राहकांना लुबाडण्याचे धंदे बंद करा अन्यथा…,ऑनलाइन मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या कॅशिफाय कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मनसे टेलिकॉम सेना आक्रमक https://www.navarashtra.com/maharashtra/the-mns-telecom-sena-is-aggressive-about-the-financial-malpractice-of-the-online-mobile-phone-buying-and-selling-company-cashify-nrvb-382458.html”]
या परिसरात काही समाज कंटकाकडून अवैध धंदे केले जात आहे. नशेबाजांकडून नागरीकांना रात्रीच्या वेळी त्रास दिला जातो. दिवा-पनवेल मार्गावर रेल्वे लोकल गाडय़ा सुरु कराव्यात. केडीएमसीच्या कमी बसेस या भागातून धावतात. त्या वाढविण्यात याव्यात आदी समस्यांचा पाढाच वाचला. या प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जाईल. मात्र सर्वप्रथम मालमत्ता कराचा विषय मार्गी लावला जाणार असल्याचे मनसे आमदार पाटील यांनी नागरीकांना आश्वासित केले.