Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये या आठवड्यापासून नवीन नळजोडणी प्रक्रिया सुरू होणार आहे. १०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार असून मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे.
सातारा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २३ जुलै रोजी होणार असून ४० विषयांचा अजेंडा ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसाठी ३.५ कोटी अन् पाणीपुरवठ्यावर महत्त्वाचे निर्णय होणार.
कर आणि पाणीपट्टी थकवणाऱ्या सामान्य नागरिकांवर कठोर कारवाई करणारे प्रशासन स्वत:च्या मालमत्तांचे भाडे थकविणाऱ्यांवर मात्र प्रभावी कारवाई करत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळानंतर मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमुल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सर्वेक्षण काळात कर वाढ होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शहरातील २ लाख ४७ हजार ३७१ मिळकतधारकांनी आतापर्यंत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. यापैकी २ लाख २१ हजार ७६३ नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला.
घर, जमीन किंवा फ्लॅटची नोंदणी ही केवळ एक कागदपत्र नसते, तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी मालमत्ता आणि मालकीचा कायदेशीर पुरावा असते. जर ही कागदपत्रे अचानक हरवली किंवा चोरीला गेली,…
घर खरेदी करणे अधिक शहाणपणाचे आहे की ते भाड्याने घेणे? या संदर्भात, गुंतवणुकीच्या जगातील एक साधे सूत्र ज्याला "१% भाडे विरुद्ध खरेदी नियम" म्हटले जाते ते अत्यंत उपयुक्त ठरू शकते.…
अनेकदा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे: Property Tax. पण नक्की मालमत्ता कर कशाला म्हणतात आणि त्याची गणना कशी केली जाते? आणि तो वेळेत भरला गेला नाही तर…
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकत कर माफी देण्याचे आश्वासन दिले हाोते. परंतु हे आश्वासन प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात भाजपला अपयश आले.
आजकाल, लोक आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास पसंती देतात. अनेक व्यक्ती स्थावर मालमत्तेमध्ये म्हणजेच Real Estate मध्ये गुंतवणूक करतात; पण हा काही साधासुधा निर्णय नाही, कारण रकमेचा खेळ आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना ‘फोन पे’द्वारे घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या डिजिटल सेवेत देशातील १० महापालिकांचा समावेश करण्यात आला असून, यामुळे नागरिकांना घरबसल्या सोप्या पद्धतीने कर भरता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सोमवारी (दि.२३) यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. मात्र, या योजनेत मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सवलत दिली जाणार नसून केवळ शास्तीवरच पूर्ण माफी लागू…
महापालिकेकडून दरवर्षी मिळकतकर देयके वितरित केली जातात आणि ती निश्चित मुदतीत भरण्याची जबाबदारी संबंधित मिळकतधारकांची असते. अनेक नागरिक धनादेशाद्वारे कर भरतात.
डोंगराळ आणि कठीण भूभाग असताना देखील बांधकाम विविध टप्प्यांमध्ये गतीने सुरू आहे. विशेषत: या रिंगरोड प्रकल्पाव्दारे अनेक मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
काही ठिकाणी मिळकतींचे अचूक मोजमाप न झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे चुकीची कर आकारणी झाल्याचे सांगत काही नागरिक कर भरणे टाळत असल्याचेही समोर आले आहे.
फुरसुंगी व उरुळी देवाची येथील नागरिकांनी नगरपरिषद स्थापन झाल्यानंतरचा कर भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, महापालिकेचा जुना थकीत कर या नव्या करासोबत जोडला गेल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध व्यक्त केला आहे.
मिळकत कर विभागाला 70 जणांचे मनुष्यबळ मिळाले आहे. यांना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिळकत कर निरीक्षकांना एका महिन्याला ठराविक ‘टार्गेट’ निश्चित करून दिले जाणार आहे.
तसेच भैरीदेव मंडळ, होन्याळीमार्फत शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. 'इस्त्रो' अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली विद्यार्थ्यीनी शताक्षी संदिप लकांबळे हिचा करण्यात आला.