Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: शिंदे गटाच्या आणखी एका मंत्र्याला फडणवीसांचा दणका; शिंदेंची तातडीची बैठक

शिंदे गट आणि महायुतीतील इतर नेतेही विविध वादांमध्ये अडकताना दिसत आहेत.आमदार अर्जुन खोतकर यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये रोकड सापडली,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 14, 2025 | 03:51 PM
धुळ्यात उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील शिंदे गटातील नेत्यांवर सातत्याने वादग्रस्त आरोप होऊ लागले असताना, आता जलसंधारण मंत्री संजय राठोड हेही अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका झाली होती. आता राठोड यांच्यावरही थेट भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने एकनाथ शिंदे गटाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात संजय राठोड यांना “दणका” दिला आहे. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपल्या आमदार, खासदार आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक ‘डॅमेज कंट्रोल’साठी घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजप आमदार संदीप जोशी यांचा गंभीर आरोप

या वादाला सुरुवात झाली ती काही दिवसांपूर्वी, जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांचे जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे भाजप आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. जोशी यांच्या म्हणण्यानुसार, “राठोड यांच्या जलसंधारण विभागात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. तब्बल आठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक करण्यात आली आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

या आरोपांचं गांभीर्य लक्षात घेता संदीप जोशी यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिलं आहे. त्यामुळे हा वाद केवळ माध्यमापुरता न राहता आता प्रशासन पातळीवरही गांभीर्याने घेतला जात आहे.दरम्यान, या साऱ्या घडामोडीमुळे शिंदे गटावर दबाव वाढताना दिसतोय. विरोधकही यावरून सरकारवर टीका करण्याची संधी साधण्याची शक्यता आहे. आगामी काळात याप्रकरणी अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

जलसंधारण खात्याची मान्यता रद्द

राज्यात महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि आरोपांच्या मालिकेला दिवसेंदिवस उधाण येत आहे. काही दिवसांपूर्वी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या वादग्रस्त नेमणुकांबाबत आरोप झाले होते. आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत जलसंधारण खात्याच्या कामांवरील सुधारित प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. हा निर्णय राठोड यांच्यासाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे.

Shiv Sena Name And Symbol : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात काय झालं? वाचा सविस्तर बातमी

संजय राठोडांवर पुन्हा आरोप

राठोड यांनी सुनील कुशिरे या अधिकाऱ्यावर एकाच वेळी तीन अतिरिक्त पदांचा कार्यभार सोपवून विशेष मेहरबानी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या खात्याशी संबंधित मंजूर कामांवरील प्रशासकीय मान्यता फडणवीसांनी थेट रद्द केल्यामुळे राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या कारभारावर आता महायुतीतीलच काही आमदार नाराजी व्यक्त करत खासगीत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत असल्याचे सांगितले जाते.

वादात इतरही नेते

या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि महायुतीतील इतर नेतेही विविध वादांमध्ये अडकताना दिसत आहेत.आमदार अर्जुन खोतकर यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये रोकड सापडली, आणि सद्यस्थितीत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.रोहयो मंत्री भरत गोगावले हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनिल तटकरे आणि खासदार नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. त्यानंतर त्यांचा एक विवादास्पद व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.

Samsung Days Sale: ई कॉमर्सनंतर आता सुरु झालाय Samsung सेल! Foldable फोनपासून फ्रीज, टिव्हीपर्यंत

या सर्व घटनांमुळे महायुती सरकार आणि विशेषतः शिंदे गटाचे अनेक मंत्री आणि आमदार अडचणीत आले असून, सरकारची प्रतिमा धक्का बसत असल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता पक्षातील अनुशासन आणि सार्वजनिक प्रतिमेचं रक्षण करणं हे मोठं आव्हान ठरत आहे.

Web Title: Fadnavis hits out at another minister from shinde group shinde calls for urgent meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 03:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.