Samsung Days Sale: ई कॉमर्सनंतर आता सुरु झालाय Samsung सेल! Foldable फोनपासून फ्रीज, टिव्हीपर्यंत... मिळणार अनेक खास डील्स
ई कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर 2025 चा मोठा सेल सुरु आहे. यानंतर आता टेक कंपनी सॅमसंगने देखील 2025 मधील सेल सुरु केला आहे. Samsung ने ‘Samsung Days Sale’ सुरु केला आहे. हा सेल 12 जुलैपासून सुरु झाला असून 18 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. कंपनीने सुरु केलेला हा सेल Samsung.com, Samsung Shop App, आणि Samsung Experience Stores वर उपलब्ध आहे. या सेलदरम्यान AI-पॉवरड फोन, स्मार्ट टिव्ही, लॅपटॉप, वॉच, टॅबलेट्स आणि होम अप्लायंसेसवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
स्मार्टफोनवर 41% पर्यंत सूट, लॅपटॉपवर 35% पर्यंत सूट, आणि टॅबलेट, वियरेबिल्स आणि एक्सेसरीजवर 65% पर्यंत सूट दिली जाणार आहे. याशिवाय, सर्व प्रोडक्टवर बँक कॅशबॅक ऑफर्स, न-कोस्ट EMI ऑप्शन्स, आणि 27.5% पर्यंत एक्सचेंज बोनस देखील दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 चे 512GB व्हेरिअंट आता 256GB व्हेरिअंटच्या किंमतीत प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. Galaxy Z Flip 7 FE चे 256GB व्हेरिअंट आता 128GB व्हेरिअंटच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. Galaxy Watch8 सह हे डिव्हाईस बंडल केल्यास 15,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.
Foldable स्मार्टफोन आणि AI TV वर देखील ऑफर्स उपलब्ध आहेत. Galaxy S25 Ultra, Galaxy S24 Ultra सह इतर स्मार्टफोन्सवर देखील 41% पर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. AI‑सक्षम टिव्ही मॉडेलवर बँक डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. याशिवाय काही टिव्हीच्या खरेदीवर फ्री टॅब्लेट किंवा साउंडबार देखील मिळणार आहे.
Galaxy Book5 Pro 360, Galaxy Book4, Tab S10 FE+, Tab S9 FE+ सारखे काही डिव्हाईस 35 ते 65 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. टॅबलेट्स आणि अॅक्सेसरीजवर डिस्काऊंटसह ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.
Galaxy S25 Series (Ultra, Edge), Galaxy S24 Series (Ultra, FE), Galaxy A Series मधील A56, A55, A36, A35, A26 या व्हेरिअंटवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
Samsung Galaxy Book5 आणि Book4 सीरीजच्या लॅपटॉपवर 35% पर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे. टॅबलेट्समध्ये Galaxy Tab S10 FE+, Tab S9 FE+, आणि Tab A9 सारख्या मॉडेल्सवर बंपर ऑफर्स उपलब्ध आहेत.
Galaxy Buds3 Pro, Galaxy Watch7 Ultra आणि Watch7 Series, Galaxy Fit3 सारख्या डिव्हाईसवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत.
43″ UHD Crystal, 55″ QLED आणि Frame TV, 65″ OLED Neo QLED हे मॉडेल्स ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Samsung च्या Neo QLED 8K, OLED, आणि QLED AI टिव्हीवर 40% पर्यंत डिस्काऊंट उपलब्ध आहे. याशिवाय टिव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना 20% पर्यंत इंस्टंट बँक डिस्काउंट देखील मिळणार आहे.