Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला जाणूनबुजून तुरुंगात टाकून मारण्याचा फडणवीसांचा डाव’; अटक वॉरंटवरून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी जरांगे- पाटील, अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला वारंवार बोलावूनही गैरहजर राहिल्याने जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 24, 2024 | 12:20 PM
‘मला जाणूनबुजून तुरुंगात टाकून मारण्याचा फडणवीसांचा डाव’; अटक वॉरंटवरून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

जालना: “मी आताच सांगतो मी जाणार नसतो, कोर्टाने पण नियमाने वागावं फडणवीसांचे ऐकून वागू नये. मी मराठा समजाला आज एकच सांगतो. मी कुठे सापडत नाही म्हणून प्रवीण दरेकरांसह अजून दहा-पंधरा जणांना माझ्याविरोधात ट्रॅप रचण्याचे काम दिले आहे. माझी काही चूक नसताना मला अडकवण्याचे काम सुरू आहे. तुम्ही तो एफआयआर वाचा, मी कोणचीही फसवणूक केली नाही. तरी मला तुरुंगात टाकण्याचे अभियान फडणवीसांनी सुरू केले आहे आणि हे पाच सहाजण ते राबवत आहेत. तुरुंगात गेल्यावरही तिथेही त्यांचेच लोक असणार तिथे ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला तयार आहे.” असा गंभीर आरोप मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी जरांगे- पाटील, अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला वारंवार बोलावूनही गैरहजर राहिल्याने जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.  या अटक वॉरंटवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

वाचा, काय म्हटले आहे मनोज जरांगे-पाटलांनी?

“मला अटक करून तुरूंगात टाकण्याच अट्टहास का, राज्यातले सर्व कोर्ट फडणवीसांच्या हातात आहेत. तो सांगेल त्यांच्या मागे एसआटी, ईडी,सीबीआय लावली जाते. त्यांच्या सांगण्याने कितीतरी जणांचे वॉरंट रद्द झाले, लोक त्यांना देव म्हणतात पण हा कसा देव आहे. हे सरळ सरळ खुन्नस काढतात. आता मी कुठेच सापडत नाही म्हणून माझ्या विरोधात वॉरंट काढायला सुरूवात केली आहे. पण मी जाणार नाही. देवेंद्र फडणवीसांचे ऐकून पोलीस आणि कोर्ट काम करणार असतील तर मी जात नसतो.

छत्रपतीचे नाटकाचे कारण काढून मला तुरुंगात टाकण्याचा आणि तिथे मारण्याचा डाव असेल तर मी हसत  मरायला तयार आहे. फडणवीसांच्या हातून मीही मरण पत्करायला तयार आहे. माझ्या शंभूराजांनी हसत मरण पत्करले आहे. पण धर्मबदलला नाही, आम्हीही त्यांचेच मावळे आहोत. छत्रपतीनीं दाखवून दिले तुकडे झाले तरी चालेल पण झुकणार नाही. आता मरण आले तरी चालेल तुमच्या हाताने आले तरी चालेल,  हसत मरण पत्करायला तयार आहे. पण तुमच्या पाया पडतो ती केस मागे घ्या, असे या जन्मात म्हणणार नाही. मी तुरुंगात जायला तयारी आहे. तसा मीही जायला तयार आहे. पण आता तर मी जाणारही नाही. काय करायचयं ते करा. माझ्याकडे द्याला घंटा पैसेही नाही.

Web Title: Fadnavis plot to kill me in jail serious charge against manoj jarang on arrest warrant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Manoj Jarange on Maratha Reservation
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
4

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.