Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा मुद्दा पेटणार; प्रकल्पाला जागा न देण्याबाबत शेतकरी ठाम

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, खानवडी या सात गावात शासनाने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची घोषणा करून आता प्रकल्पाचा एक एक टप्पा पूर्ण केला जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 04, 2025 | 11:16 AM
Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा मुद्दा पेटणार; प्रकल्पाला जागा न देण्याबाबत शेतकरी ठाम
Follow Us
Close
Follow Us:

सासवड :  विमानतळ प्रकल्पाबाबत शासनाने यापूर्वी निर्णय झालेला आहे. प्रकल्पामुळे भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांशी शासन सहमत आहे, मात्र प्रकल्प आवश्यक असल्याने पूर्ण करावाच लागेल. तुम्ही तुमच्या अडचणी, भूमिका मांडा मात्र त्या गृहित धरून शासनाची भूमिका पार पाडली जाईल. सर्वेक्षण आणि मोजणी प्रसंगी संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून आपले क्षेत्र किती आहे हे सांगावे. प्रकल्पाबाबतचे प्रश्प समन्वयाने सोडवू, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, अशा शब्दात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र शासनाचा भूमिकेनंतरही ग्रामस्थानी विमानतळ प्रकल्पाला जाहीर विरोध केला आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, खानवडी या सात गावात शासनाने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची घोषणा करून आता प्रकल्पाचा एक एक टप्पा पूर्ण केला जात आहे. मागील आठवड्यात ड्रोन सर्व्हेची निविदा प्रसिद्ध केल्यानंतर आता ज्या गावातील क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्या गावांतील नागरिकांशी चर्चा करून शासनाची भूमिका पटवून दिली जात आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ३) एखतपूर – मुंजवडी गावातील नागरिकांशी भूसंपादन विभागाचे उप जिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी चर्चा केली. गावातील स्थानिक प्रश्नांसाठी ग्रामसभा महत्वाच्या मात्र राज्याचा, देशाचा प्रकल्प असेल तर याबाबत शासन स्वतंत्र निर्णय घेते त्यामुळे तुमच्या आजपर्यंतच्या ग्रामसभांच्या ठरावांना महत्व नाही, असे स्पष्ट केले.

Educational News : ‘एक राज्य एक गणवेश’ योजना गुंडाळली’; काय आहे शासन निर्णय

पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, भोर उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, नायब तहसीलदार संदीप पाटील, भूमी अधीक्षक स्मिता गौड, कृषी अधिकारी सूरज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य  दत्ता झुरंगे, एखतपूरच्या सरपंच शितल टिळेकर, उपसरपंच विशाल झुरंगे, महादेव टिळेकर, माणिक निंबळकर, संतोष हगवणे, अमोल टिळेकर आदी उपस्थित होते.

आम्हाला गृहीत धरून कामे केली मग आता का विचारता?

शासनाने आमच्या गावात आमच्या परवानगी शिवाय विमानतळ प्रकल्प जाहीर केला. त्यातील एकएक टप्पा पूर्ण केला जात आहे. आता थेट भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु होत असताना आम्हाला आजपर्यंत काहीच माहिती दिली गेली नाही. त्यामुळे आम्हाला विश्वासात न घेता गृहीत धरून कामे करीत असताल तर आता आमच्याबरोबर चर्चा करायला का आलात ? असा थेट प्रश्न एखतपूर गावच्या सरपंच शितल टिळेकर यांनी उपस्थित केला.

नोटीस दिल्यानंतरच सर्व्हे करू

उपसरपंच विशाल झुरंगे यांनी शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता एमएडीसी कडून एम आय डी सी कडे परस्पर प्रकल्प वर्ग केला त्यामुळे आम्हाला आमच्या अडचणी मांडता येणार नाहीत. एजंट यांनी शेतकऱ्यांना फसवून कमी दरात व्यवहार केले आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून नोंदी केल्या त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का ? कलम ३२ ग ची नोटीस काढताना शेतकऱ्यांना माहिती देणार का ? असे प्रश्न उपस्थित केले. यावर शेतकऱ्यांना प्रथम नोटीस देण्यात येईल त्यानंतरच सर्व्हे करून भूसंपादन करण्यात येईल असे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले.

गुंजवणीचे पाणी शेतीसाठी कि विमानतळ प्रकल्पासाठी ?  

उदाचीवाडी येथील संतोष हगवणे यांनी ग्रामसभेचा ठरवला महत्व नसेल तरकायदाच रद्द करून मनमानी पद्धतीने जमीन घ्यावी अशा शब्दात संताप व्यक्त केला. दरम्यान ज्या गुंजवणीच्या पाण्यावरून तालुक्यात अनेकवर्षे राजकारण सुरु आहे त्या योजनेचे पाणी शेती का विमानतळ साठी असा प्रश्न उपस्थित केला असता. शेतीसाठी पाणी देण्यात येणार असून त्याच बरोबर उर्वरित पाणी विमानतळ प्रकल्पासाठी देण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले.

Web Title: Farmers are adamant about not giving land to purandar airport project direct warning in deputy commissioners meeting nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Purandar airport project

संबंधित बातम्या

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनबाबतच्या हरकतींवर ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी
1

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनबाबतच्या हरकतींवर ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

Sharad Pawar News: हा निर्णय केंद्र सरकारच्या हातात…;  पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शरद पवार स्पष्टचं बोलले  
2

Sharad Pawar News: हा निर्णय केंद्र सरकारच्या हातात…; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शरद पवार स्पष्टचं बोलले  

पुरंदर विमानतळाबाबत अडचणी जाणून घेण्यासाठी बैठकांचे नियोजन; मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ
3

पुरंदर विमानतळाबाबत अडचणी जाणून घेण्यासाठी बैठकांचे नियोजन; मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ

Purandar Airport Project: तिसऱ्या दिवशी उपोषण मागे; पण पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध कायम
4

Purandar Airport Project: तिसऱ्या दिवशी उपोषण मागे; पण पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.