Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन वर्षांपासून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत, आमदार डॉ. भोयर यांनी दिले उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

सदर प्रस्तावात ११७०६८.८८ हेक्टर मधील सोयाबीन पिकाचे ७९ कोटी ६० लक्ष ७५ हजार १८४ रूपयांचे  तर १४५१८७.५२ हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकाचे ९८ कोटी ७२ लक्ष ७५ हजार १३६ रूपयांचे नुकसान झाल्याचे शासनास कळविले होते. नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांना मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आमदारांनी पाठपुरावा केला होता. मात्र, अजूनपर्यंत निधी प्राप्त न झाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 22, 2022 | 11:20 AM
Farmers have been waiting for compensation for two years, MLA Dr. Bhoyer gave a statement to the Deputy Chief Minister

Farmers have been waiting for compensation for two years, MLA Dr. Bhoyer gave a statement to the Deputy Chief Minister

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : खरीप हंगाम २०२० मध्ये सततच्या पावसामुळे व सोयाबीन पिकावरील खोडअळी (the worm) तसेच कापसावरील गुलाबी अळीमुळे (Pink bollworm on cotton) जिल्ह्यात २६२२५७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. अळी व पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतक-यांना १७८ कोटी ३३ लाख ५० हजार ३२० रूपये भरपाई देण्यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षकांनी(District Agriculture Superintendent) जिल्हाधिका-यांमार्फत प्रस्ताव सादर केला होता. मात्र, मागील दोन वर्षांपासून सरकारने मदतीची रक्कम न दिल्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. अशातच मागील १५ दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अशा विदारक परिस्थितीमध्ये शेतक-यांची नुकसानाची भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर (MLA Dr. Pankaj Bhoyer) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात (the office of the Divisional Commissioner) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी ही बाब निर्दशनास आणून देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. बैठकीला विभागीय आयुक्त पियुष सिंग (Divisional Commissioner Piyush Singh), जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (Collector Prerna Deshbhartar), जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) डॉ. सचिन ओंबासे (Dr. Sachin Ombase) व अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामातील ऑगस्ट २०२० मध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यातून पीक सावरत नाही तर सोयाबीन पिकावर खोड अळीने आक्रमण केल्याने बहुसंख्य शेतक-यांनी पीक सुद्ध कापले नाही. तसेच, कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी व इतर रोगांनी आक्रमण केल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. कृषी विभागाने (the Department of Agriculture) नुकसानीचा सर्व्हे करून जिल्हाधिका-यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावात ११७०६८.८८ हेक्टर मधील सोयाबीन पिकाचे ७९ कोटी ६० लक्ष ७५ हजार १८४ रूपयांचे  तर १४५१८७.५२ हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकाचे ९८ कोटी ७२ लक्ष ७५ हजार १३६ रूपयांचे नुकसान झाल्याचे शासनास कळविले होते. नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांना मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आमदारांनी पाठपुरावा केला होता. मात्र, अजूनपर्यंत निधी प्राप्त न झाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

या वर्षीसुद्धा १७ व १८ जुलैला वर्धा जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक १६९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहू लागले तसेच धरणातून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा जलमय झाला. अनेक शेतक-यांच्या शेतातील उभी पिके पुरामुळे खरडून गेली व काही शेतात पाणी साचल्याने पीके सडून गेली आहेत. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या कोपामुळे हवालदिल झाला आहे. अशातच सन २०२० मध्ये सोयाबीन व कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीची रक्कम प्राप्त न झाल्याने शेतक-यांच्या अडचणीत एकप्रकारे भरच पडली आहे. वर्तमान सरकार शेतकरी हिताचे सरकार म्हणून समजले जाते, त्यामुळे, आपण पुढाकर घेऊन १७८ कोटी ३३ लक्ष ५० हजार ३२० रूपये भरपाई देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी आमदार डाँ. भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Web Title: Farmers have been waiting for compensation for two years mla dr bhoyer gave a statement to the deputy chief minister nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2022 | 11:20 AM

Topics:  

  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.