mumbai khar fire
मुंबई: खारदांडा (Khar Koliwada Fire News) कोळीवाड्यात एका बेकरीला (Mumbai Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीत सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Fire In Mumbai Khardanda Koliwada)
Maharashtra | 6 people suffered burn injuries after fire broke out at a house in Mumbai’s Khar West area. The fire broke out due to gas leakage. Fire has been brought under control and the cooling process is underway: BMC
— ANI (@ANI) May 15, 2023
या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आहे.अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान गॅस गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी, अद्याप आगीचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत सहा जण जखमी झाले आहेत. तसेच वित्तहानीही झाली आहे.
सहा जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश
सहा जखमींमधील सखुबाई जायसवाल (वय -65) या 45% भाजल्या आहेत. प्रियंका जायसवाल (वय -26) 51% भाजल्या आहेत निकिता मंडलिक (वय-26) 45% तर सुनील जायसवाल (वय 29) 50% आगीत भाजल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत दोन लहान मुलंही भाजले आहेत. यशा चव्हाण (वय -07) 40 फीसदी और प्रथम जायसवाल (वय -06) 45 टक्के भाजले आहेत. या सगळ्यांवर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.