Marathwada Heavy Rainfall: महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या प्रचंड नुकसानीसाठी केंद्र सरकारने किमान १०,००० कोटी रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानभरपाईची रक्कम थेट जमा करावी आणि त्या खात्यांमधून बँकांनी कर्जहप्ते वळती करून घेऊ नयेत, यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. पंचनामे आणि नियमांच्या तपासणीमध्ये वेळ घालवू नये, तर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळेल याकडे लक्ष द्यावे, असही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हररेटसाठी भारताला दंड
उद्धव ठाकरे म्हणाले, ” केंद्र सरकारने सर्वात आधी नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावी आणि नंतर त्याची शहानिशा करत बसावी. जुन्या निकषांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मर्यादित मदत न देता ती तीन हेक्टरपर्यंत वाढवावी, तसेच, ओल्या दुष्काळाचे निकष न लावता शेतकऱ्यांना सढळ हस्ते मदत जाहीर करावी. याशिवाय “स्वतःच्या जाहिरातबाजीसाठी पैसा उधळण्याऐवजी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या,” असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला केलं आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे, आजपर्यंत दुष्काळग्रस्त मानल्या जाणाऱ्या लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही शेतपीके पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात शेतकरी बेसावध होता. मराठवाड्याने इतक्या वर्षांपासून ढगफुटी, अतिवृष्टी पाहिली नव्हती. धाराशिवमध्येही काही वर्षांपूर्वी गारपीट झाली होती. पण यावेळी झालेल्या पावसाने मात्र लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकेही डोळ्यादेखत पाण्याखाली गेली आहेत.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका बसला असून जमीन वाहून गेल्याने रब्बी पिकं धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी गुरेढोरे वाहून गेली, रस्ते कोसळले आणि शेतकऱ्यांचे जगण्याचे साधनच पाण्यात गेले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांना बसलेला फटका किती भीषण आहे, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने तातडीने किमान १०,००० कोटी रुपयांची मदत जाहीर करावी,” अस आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
तसेच, नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावी आणि त्या खात्यांमधून बँकांनी कर्जहप्ते वळती करू नयेत, यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. “पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ दवडू नका, शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्या,” असे ठाकरेंनी स्पष्ट केले.