Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

परभणीत काँग्रेस पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेसारखी भूमिका घ्यायची का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 11, 2026 | 12:30 AM
ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत...

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत...

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूरच्या महापौर निवडणुकीत भाजपाकडून घोडेबाजार
  • शिवसेनेच्या भुमिकेप्रमाणे काँग्रेसने वागायचे का?
  • हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
मुंबई : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेस ऐवजी भाजपला पाठिंबा दिला आहे. चंद्रपूरमधील घडामोडींचा परिणाम परभणीत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परभणी महापालिकेतील महापौर पदाची निवड 12 फेब्रुवारीला होणार आहे. परभणीत काँग्रेस पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेसारखी भूमिका घ्यायची का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

 

चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्याने भाजपाचा उमेदवार १ मताने विजयी झाला. शिवसेना (उबाठा) ने चंद्रपुरात जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असं सपकाळ म्हणाले.

चंद्रपूर महापौर निवडणुकीसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व एमआयएमची अदृष्य युती आहे याचा अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूर नंतर चंद्रपुरातही प्रत्यय आला आहे. चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदतच केली आहे, भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांनी काँग्रेसला मदत केली असती तर काँग्रेसचा महापौर झाला असता.

काँग्रेसचा महापौर बनवण्यासाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभाताई धानोरकर या नेत्यांना एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला व त्यांनी एकत्र येऊन कामही केले. काँग्रेसमध्ये कोणतीच फाटाफुट झालेली नाही. या निवडणुकीचा अहवाल पक्ष निरिक्षकांकडून मागवण्यात येईल व नंतर त्यावर सखोल चर्चा केली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले; गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has questioned uddhav thackerays role in shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • Harshvardhan Sapkal
  • Parbhani
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
2

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
3

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
4

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.