Rain News: पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे, आजपर्यंत दुष्काळग्रस्त मानल्या जाणाऱ्या लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही शेतपीके पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात शेतकरी बेसावध होता.
कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातही पाऊस बरसला आहे. जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले.