Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024 : पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा आरोप; पक्षाचे निकष न पाळल्याचा ठपका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे तिकीट विकले, असा आरोप माजी आमदार विजय खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत केला आहे. उमरखेड मतदारसंघातून विजय खडसे इच्छुक होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2024 | 10:02 AM
पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा आरोप (फोटो सौजन्य-X)

पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा आरोप (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Vijay Khadse on Nana Patole :  माजी आमदार विजय खडसे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने मंगळवारी (30 ऑक्टोबर) अपक्ष अर्ज दाखल केला. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून 2009 च्या निवडणुकीत खडसे हे काँग्रेसकडून लढले आणि विजयी झाले होते. त्यांनी उमरखेड मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे अर्ज केला होता. मात्र सर्वेक्षणात आपण अव्वल स्थानी होतो, असा दावाही खडसे यांचा आहे. याचदरम्यान विजय खडसे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केला आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसविरोधात बंडाचे निशाण फडकवत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा: ‘भारतीय जनता पक्षाचे काम बोलते, सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या’; राम सातपुते यांचं विधान

२००९ साली काँग्रेसच्या तिकिटावर उमरखेड मतदारसंघातून विजयी झालेले खडसे यांनी या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी दावा केला की पक्षाच्या सर्वेक्षणात ते सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार ठरले होते. परंतु, तरीदेखील पक्षाने त्यांना डावलून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली, ज्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या भावना नाकारल्या जात असून, पक्षाचे नेतृत्व निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर देशभरात काँग्रेसच्या वातावरणाला बळ मिळाले होते. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी निवड समितीला विशिष्ट निकष पाळण्याचे निर्देश दिले होते. विशेषतः भ्रष्टाचारी व्यक्तींना तिकीट देऊ नये, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला होता. मात्र, नाना पटोले यांनी या निकषांकडे दुर्लक्ष करून पक्षाच्या तिकीटाची विक्री केल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे.

खडसे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याचा असा थेट आरोप काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो. नाना पटोले यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून असंतोष वाढत चालला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विजय खडसे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने उमरखेड मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी असलेले मजबूत गड मानले जाणारे उमरखेड आता काँग्रेससाठी आव्हान बनले आहे.

हे सुद्धा वाचा:  288 जागांवर 7995 उमेदवार रिंगणात, महायुती-मविआमध्ये किती जागांवर कोण लढणार? 

काय म्हणाले नाना पटोले?

कोण विकाऊ आहे हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर अधिक वक्तव्य करू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Web Title: Former mla vijay khadse filed his nomination papers an accusation that nana patole sold congress tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 10:02 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Nana patole

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis:  “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”
1

Devendra Fadnavis: “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला
2

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे…; पटोलेंनी ठणकावून सांगितलं
3

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे…; पटोलेंनी ठणकावून सांगितलं

Assembly Session 2025: विधानसभा अध्यक्षांचा खरंच अपमान केला का?  सभागृहात नेमकं काय घडलं; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
4

Assembly Session 2025: विधानसभा अध्यक्षांचा खरंच अपमान केला का? सभागृहात नेमकं काय घडलं; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.