Honey Trap: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हनी ट्रॅप बाबत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत, असा दावा कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.
या सरकारमध्ये थोडी जरी धमक असती तर त्यांनी पुढाकार घेतला असता. लोणीकर आणि कोकाटे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला त्यावर पुढे येऊन भूमिका मांडली असती, चूक मान्य केली असती…
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन २०२५: मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बराच गोंधळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांना सभापती राहुल नार्वेकर यांनी दिवसभरासाठी निलंबित केले.
राहुल गांधी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये आर्टिकल वॉर सुरु असताना महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्या खास ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांकडून पक्षप्रवेश करून घेतला जत आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीच्या मित्रपक्षांना खास ऑफर दिली आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर, सकाळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राजीनामा घेतल्याचं सांगितलं, असं पटोले यांनी म्हटलं आहे.