Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कासारीत कुत्र्याची समजून कोल्ह्याची पिल्ले आणली घरी; प्राणीमित्रांना माहिती मिळताच…

कासारी (ता.शिरुर) येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांजवळ कोल्ह्याची पिल्ले असल्याचे प्रकाश रासकर यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांच्या ओळखीच्या वनरक्षक ऋतुजा भोरडे यांना माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 02, 2025 | 03:07 PM
कासारीत कुत्र्याची समजून कोल्ह्याची पिल्ले आणली घरी; प्राणीमित्रांना माहिती मिळताच...

कासारीत कुत्र्याची समजून कोल्ह्याची पिल्ले आणली घरी; प्राणीमित्रांना माहिती मिळताच...

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : कासारी (ता.शिरुर) येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांनी शेतात आढळून आलेल्या कोल्ह्याची पिल्ले कुत्र्याची पिल्ले समजून घरी आणली. मात्र, एका नागरिकाच्या सतर्कतेने त्या पिलांची प्राणीमित्रांकडून सुटका करत निसर्गात मुक्त करण्यात आले.

कासारी (ता.शिरुर) येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांजवळ कोल्ह्याची पिल्ले असल्याचे प्रकाश रासकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ओळखीच्या वनरक्षक ऋतुजा भोरडे यांना माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक ऋतुजा भोरडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे अमोल कुसाळकर, शुभम वाघ, प्रकाश रासकर यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली.

या दरम्यान त्या उसतोड कामगारांच्या मुलांनी कुत्रे समजून कोल्ह्याच्या तीन पिल्लांना घरी आणल्याचे समजले. दरम्यान, वनरक्षक व प्राणीमित्रांनी त्यांना समज देत कोल्ह्याच्या पिल्लांना ताब्यात घेत ज्या शेतातून मुलांनी पिल्ले आणली. त्या शेताच्या जवळ नैसर्गिक आधिवासात मुक्त केले.

वन्यजीव धोक्यात

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने वन्यजीवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार बघता राज्य पातळीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याकरिता पूर्णवेळ समर्पित असे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो, स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याची अंमलबाजवणी अद्यापही झाली नाही. परिणामी वन्यजीव धोक्यात आले आहे.

वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण अधिक

गोंदियासारख्या जिल्ह्यात नैसर्गिकदृष्ट्या जैवसंपन्न आहे. जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचप्रकारे राखीव आणि नियमीत वनक्षेक्ष देखील आहे. त्या जंगलात वाघ, बिबट व इतर वन्यजिवांच्या शिकारी व अवैध व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे. वाघ, बिबट, अस्वल, खवले मांजर, घोरपड, हरीण, काळविट, चितळ आणि पक्ष्यांची शिकार देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Fox cubs brought home by mistake for dogs in kasari nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Shikrapur News
  • Wild Animals

संबंधित बातम्या

बर्फाचा थर तुटण्याच्या भीतीने पांढऱ्याशुभ्र पोलर बियरने लढवली अनोखी शक्कल, रेंगाळत पार केला रस्ता; लोक म्हणाले,”हा खरा बुद्धिमानी”
1

बर्फाचा थर तुटण्याच्या भीतीने पांढऱ्याशुभ्र पोलर बियरने लढवली अनोखी शक्कल, रेंगाळत पार केला रस्ता; लोक म्हणाले,”हा खरा बुद्धिमानी”

National Wildlife Day 2025 : निसर्गाशी सहअस्तित्वाचे वचन! वाचा लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण का आहे गरजेचे?
2

National Wildlife Day 2025 : निसर्गाशी सहअस्तित्वाचे वचन! वाचा लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण का आहे गरजेचे?

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर
3

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, “हा आदेश…”
4

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, “हा आदेश…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.