Accident: रखडलेल्या रस्ताकामाचा बळी? कार उलटून २२ वर्षीय तरुणाचा करुण अंत; महामार्गाच्या कामाविरोधात ग्रामस्थांचा संताप

Buldhana Ghatnandra Road Accident: दुधा-सैलानी मार्गावरील घाटनांद्रा शिवारात कार उलटून २२ वर्षीय प्रशिश उर्फ गोपी हिवाळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपूर्ण रस्त्यामुळे अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
Buldhana  Ghatnandra Road Accident:
Buldhana Ghatnandra Road Accident:photo- Representative
Published on: 
Updated on: 
  • अर्धवट महामार्गावर मृत्यूचा सापळा?

  • कार उलटून तरुणाचा दुर्दैवी अंत

  • घाटनांद्रा शिवारातील भीषण अपघात

बुलढाणा: दुधा ते सैलानी मार्गावरील घाटनांद्रा शिवारात कार उलटून ढालसावंगी येथील प्रशिश उर्फ गोपी (२२) विजय हिवाळे या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घटना घडली. रस्त्याचे अपूर्ण काम आणि निर्माण झालेली असुरक्षित परिस्थिती या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशिश उर्फ गोपी हिवाळे हा बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेत होता.

शिक्षणासोबतच वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून तो त्यांच्या कामात हातभार लावत होता. त्याच्या वडिलांचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय असून, अॅप चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबाकडे थोडी शेती असली तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे विजय हिवाळे हे दिवसभर प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायातून कुटुंबाला आधार देण्यासाठी मेहनत घेतात. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कष्टाची पराकाष्ठा केली. वडिलांच्या मेहनतीची जाणीव असलेल्या गोपीनेही शिक्षण सांभाळून त्यांच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी हिवाळे कुटुंबाने कार खरेदी केली होती.

Buldhana  Ghatnandra Road Accident:
Nagpur News : १४ वर्षीय मुलीचे कारमधून अपहरण; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अपहरणासाठी वापरलेले वाहन सोडले

मात्र, याच कारच्या अपघातात गोपीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला. एमएच ०२ / सीएल- ९८३३ क्रमांकाची कार घेऊन गोपी ढालसावंगी येथून दुधामार्गे सैलानीकडे जात होता. दुधा गाव मागे टाकल्यानंतर घाटनांद्रा शिवारात कार उलटल्याने त्याचा मृत्यू झाला. एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. रखडलेल्या कामाला गती देऊन रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती दूर करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गोपीच्या मृत्यूमुळे हिवाळे कुटुंबाने गमावलेला आधार या दुर्घटनेचे गांभीर्य अधोरेखित करीत आहे.

महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह

चिखली तालुक्यातील हातणीपासून रायपूर, सैलानीमार्गे दुधा (ता. बुलढाणा) गावापर्यंत सिमेंट कॉक्रिटचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला, मात्र, या मार्गावरील काही भागात काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अधिग्रहित शेतजमिनीचा मोबदला प्रशासनाकडून मिळाला नसल्याच्या कारणावरून संबंधित शेतकऱ्यांनी कामास विरोध केल्याने रस्त्याचे बांधकाम रखडल्याचे सांगण्यात येते.

अपूर्ण रस्त्याच्या भागात एका बाजूने कॉंक्रिटचे काम झालेले नाही, तर रस्त्याच्या बाजूला खोदकाम करण्यात आल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेमुळे आणि वाहतुकीसाठी निर्माण झालेल्या अडचळ्यामुळे अपघाताचा धोका वाढला असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. घाटनांद्रा शिवारातील अपघातही याच अर्धवट रस्त्याच्या कामामुळे घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Buldhana  Ghatnandra Road Accident:
PM VIKAS Scheme: शिका मोफत, कमवा दरमहा! एकाच सरकारी योजनेतून मिळणार 5 योजनांचे फायदे