ठाणे: गेल्या काही दिवसापासून राज्यात महिलांवरील गुन्हे वाढत असल्याचं दिसत आहे. लग्नास नकार दिल्याच्या कारणावरुन तरुणाकडून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना नुकतीच पुण्यात घडली होती. आता ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका महिलेचे तरुणीचं अपहरण करून तीचं बळजबरी धर्मांतर करुन लग्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोमवारी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक युवक, त्याची आई आणि लग्न लावणारा मौलवी यांचा समावेश आहे
[read_also content=”केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं निधन, वयाच्या 79 वर्षी घेतला अखेरचा श्वास https://www.navarashtra.com/india/kerala-former-cm-oman-chandi-died-at-the-age-of-79-nrps-432975.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी 2021 मध्ये एका कॉम्प्युटर क्लासमध्ये भेटले होते. दोघांची चांगली ओळख होती. मात्र, तरुणाने लग्नास मागणी घातली मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या युवकाने लग्न न केल्यास मुलीला आत्महत्येची धमकी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या घरीही मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तिच्या नग्न छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.
मुलगी नकार देत असल्यामुळे 20 जून रोजी आरोपींनी तिचे अपहरण केले आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी लग्न केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित विवाह एका दर्ग्यात करण्यात आला होता, जिथे मुलीचे धर्मांतर करण्यास भाग पाडले जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, शेजाऱ्यांनी मुलीची सुटका केली कारण आरोपीचे कुटुंबीय घराबाहेर जाताना तिला आतून बंद करत असत. त्यावेळी संधीचा फायद घेत त्यांनी तीची सुटका केली.
या दरम्यान अनेकदा मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी आरोपी तिला परत आणायचा. आणि यावेळी जेव्हा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र, ती कशीतरी निसटून आई-वडिलांच्या घरी पोहोचण्यात यशस्वी झाली. यानंतर नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सुरू आहे.