Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर लवकरच कमी होणार

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आता लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून गृहिणींचं कोलमडलेलं महिन्याचं बजेट देखील सुरळित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचा पुरवठा विस्कळीत झाला होता. भाज्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2024 | 10:46 AM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आता लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून गृहिणींचं कोलमडलेलं महिन्याचं बजेट देखील सुरळित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचा पुरवठा विस्कळीत झाला होता.

राज्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा, टोमॅटो, बटाटा यासांरख्या भाजीपाल्याचं उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्यामुळे परिणामी पुरवठा देखील कमी झाला आहे. पुरवठा कमी आणि वाढत्या मागणीमुळे भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या प्रति किलो टोमॅटोची किंमत दिल्लीत 70 ते 80 रुपये, मुंबईत 80 ते 90 रुपये आणि कोलकात्यात 80 ते 90 रुपये आहे. पुरवठा घटल्यामुळे टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र आता लवकरच पुरवठा सुरळित होऊन टोमॅटोचे दर कमी होतील, अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे. दिल्लीत टोमॅटो हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून येत आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून हायब्रीड टोमॅटोची आवक होताच टोमॅटोचे भाव कमी होऊ लागतील .

मुंबईत प्रतिकिलो कांद्यासाठी ग्राहकांना 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच प्रतिकिलो बटाट्याची किंमत 40 ते 45 रुपये आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा यासोबतच इतर भाज्यांच्या किंमतीत देखील वाढ होत आहे. हिरवी मिरची 160 रुपये किलो, कोथिंबीर 300 रुपये किलो, बीन्स 200 रुपये प्रति किलो, कोबी 160 रुपये किलो, आलं 280 रुपये किलो, लसूण 280 रुपये किलो झाली आहे. पावसाळ्यापूर्वी टोमॅटो 35 ते 40 रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. मात्र आता टोमॅटोची किंमत 80 ते 90 रुपये प्रतिकिलो झाली आहे. टोमॅटोसह इतर भाज्यांच्या किंमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भाजीपाल्यांसह डाळी आणि फळांच्या किंमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हवामान बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे.

सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. तर शेतकऱ्यांना दरवाढीचा चांगलाच फायदा होत आहे. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसत आहे. तसेच गृहिणींचे महिन्याचे बजेट देखील कोलमडत आहे. मात्र आता लवकरच सगळ्यांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Good news for common people prices of tomato onion and potato will come down soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • onion price
  • Retail Inflation

संबंधित बातम्या

Onion Rate : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट; निच्चांकी दरामुळे शेतकरी हवालदिल
1

Onion Rate : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट; निच्चांकी दरामुळे शेतकरी हवालदिल

Retail Inflation: सर्वसामान्यांना झटका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई पुन्हा वाढली, महागाई दर २.०७ टक्क्यांवर पोहोचला
2

Retail Inflation: सर्वसामान्यांना झटका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई पुन्हा वाढली, महागाई दर २.०७ टक्क्यांवर पोहोचला

सर्वसामान्यांना दिलासा! महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, ‘या’ वस्तू झाल्या स्वस्त
3

सर्वसामान्यांना दिलासा! महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, ‘या’ वस्तू झाल्या स्वस्त

२० पैकी १६ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या, सलग ८ व्या महिन्यात महागाई झाली कमी
4

२० पैकी १६ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या, सलग ८ व्या महिन्यात महागाई झाली कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.